नाशिक : नाशिक पश्चिम वनविभाग ‘बॉम्बे हिस्ट्री नेचर सोसायटी’च्या मदतीने गिधाड संरक्षित परीघ जाहीर करण्यासाठी टेलिमेटरीद्वारे सूक्ष्म अभ्यासाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविणार होते; मात्र अद्याप या प्रकल्पाअंतर्गत कुठल्याही हालचालींना प्रारंभ झाला नसल्याने दहा लाखांचा निधी प्राप्त होऊनही प्रकल्प रखडल्याचे चित्र आहे.जगाच्या पाठीवरून नाहीसा होत चाललेला नैसर्गिक अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक गिधाडाला वाचविण्यासाठी सर्वस्तरावर प्रयत्न होत आहे. याचाच एक भाग म्हणून हा प्रकल्प वनविभागाने हाती घेण्याचे ठरविले. गिधाडांच्या हालचाली टिपण्यासाठी तसेच त्यांचा अधिवास व खाद्याचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने उपग्रह टेलिमेटरी यंत्रणेच्या आधारे निरीक्षण नोंदवून अभ्यास करण्याचा मानस वनविभागाकडून व्यक्त करण्यात आला होता. या प्रकल्पाचा कालावधी एकू ण पाच वर्षांचा असून, त्यासाठी अंदाजे दोन कोटींचा खर्च प्रस्तावित आहे. वन मंत्रालयाकडून पहिल्या टप्प्यासाठी ७२ लाखांपैकी दहा लाखांचा निधी नाशिक पश्चिम वनविभागाला प्राप्तदेखील झाला आहे. या निधीमधून प्रकल्पाचा ‘श्रीगणेशा’ केला जाणार असल्याची माहिती जानेवारी महिन्यात उपवनसंरक्षकांकडून देण्यात आली होती. अकरा महिन्यांचा कालावधी उलटूनदेखील अद्याप या प्रकल्पांतर्गत कुठल्याही गोष्टींची सुरुवात झालेली दिसून येत नाही. गिधाड संवर्धनासाठी पूरक असे क्षेत्र सिद्ध करण्यासाठीहा प्रकल्प वनविभागाने हाती घेतला आहे; मात्र या प्रकल्पाच्या शुभारंभासाठी अद्याप ‘मुहूर्त’ वनविभागाला मिळालेला नाही.अंजनेरी डोंगररांगेत अधिवासशहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या अंजनेरी गावातील डोंगररांगेत गिधाडांचा अधिवास आढळतो. त्यामुळे अंजनेरीला केंद्रबिंदू ठरवून तेथून सुमारे १०० किलोमीटरच्या क्षेत्रात गिधाडांसाठी सुरक्षित अधिवासाचा अभ्यास याअंतर्गत करण्यात येणार आहे.
गिधाड ‘टेलिमेटरी’ प्रकल्प रखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 12:31 AM
नाशिक पश्चिम वनविभाग ‘बॉम्बे हिस्ट्री नेचर सोसायटी’च्या मदतीने गिधाड संरक्षित परीघ जाहीर करण्यासाठी टेलिमेटरीद्वारे सूक्ष्म अभ्यासाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविणार होते; मात्र अद्याप या प्रकल्पाअंतर्गत कुठल्याही हालचालींना प्रारंभ झाला नसल्याने दहा लाखांचा निधी प्राप्त होऊनही प्रकल्प रखडल्याचे चित्र आहे.
ठळक मुद्देसंरक्षित परीघ : ‘बीएचएनएस’च्या सहाय्याने सूक्ष्म अभ्यास