शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

वडाळागाव चौफुली ते साईनाथनगर  जॉगिंग ट्रॅकलगत वाहते गटार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2018 1:10 AM

वडाळागाव चौफुली ते साईनाथनगरपर्यंत साधारणत: १ कि.मी.चा जॉगिंग ट्रॅक उजव्या कालव्याच्या जागेत तयार करण्यात आला आहे. या ट्रॅकवर मातीचा रस्ता तयार करून चार ते पाच वर्षांचा कालावधी उलटला तर गाजरगवताची कापणी मागील दोन वर्षांपासून होऊ शकलेली नाही. ट्रॅकशेजारून भूमिगत गटारीचे चेंबर तुडुंब भरून वाहत असल्याने दुर्गंधी पसरली आहे.

नाशिक : वडाळागाव चौफुली ते साईनाथनगरपर्यंत साधारणत: १ कि.मी.चा जॉगिंग ट्रॅक उजव्या कालव्याच्या जागेत तयार करण्यात आला आहे. या ट्रॅकवर मातीचा रस्ता तयार करून चार ते पाच वर्षांचा कालावधी उलटला तर गाजरगवताची कापणी मागील दोन वर्षांपासून होऊ शकलेली नाही. ट्रॅकशेजारून भूमिगत गटारीचे चेंबर तुडुंब भरून वाहत असल्याने दुर्गंधी पसरली आहे.जॉगिंग ट्रॅक संकल्पना खरी तर निरामय सुदृढ आरोग्यासाठी विकसित करण्यात आली आहे. शहरातील जॉगिंग ट्रॅक या संकल्पनेनुसार विकसित करण्यात आलेदेखील आहे; मात्र वडाळागावचा जॉगिंग ट्रॅक याबाबत अपवाद ठरतो. या जॉगिंग ट्रॅकवरून फेरफटका मारणे म्हणजे निरोगी शरीर रोगी करून घेण्यासारखेच आहे. कारण जॉगिंग ट्रॅकला आलेला बकालपणा, वाढलेले गाजरगवत, ठिकठिकाणी पडलेला कचरा, वाहणारी गटारगंगा, खड्डे, बाकांचा अभाव, पथदीपांची असुविधा, व्यायाम साहित्याची कमतरता, संरक्षक कुंपणाची तटबंदी नाही, अशा एक ना अनेक समस्यांनी या जॉगिंग ट्रॅकला ग्रासले आहे. केवळ एक ते दीड किलोमीटरचा हा ट्रॅक विकसित करण्याबाबत महापालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधीदेखील तितकेच उदासिन आहेत. या जॉगिंग ट्रॅकचा वापर भाजीबाजार, वाहनतळासाठीदेखील केला जाऊ लागल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.  वडाळागावातील तरुण, तरुणी, महिला, ज्येष्ठ नागरिकांकडून वडाळा चौफुली ते साईनाथनगरपर्यंतच्या ट्रॅकला अधिक प्राधान्य दिले जाते; मात्र या ट्रॅकची दुर्दशा बघून नागरिकांना नाइलाजास्तव पाठ फिरवावी लागत आहे. कालव्याच्या जागेत वृक्षराजी चांगली बहरली असून गरज आहे ती जॉगिंगट्रॅकच्या विकासाची. चार वर्षांपूर्वी मुरूम टाकून वृक्षराजीच्या मध्य भागातून केवळ रस्ता तयार करून महापालिकेने जबाबदारी पूर्ण केल्याचा आव आणला आणि हात झटकले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका