इंदिरानगर : वडाळागावातील अनधिकृत भंगार गुदामांच्या अतिक्रमणामुळे बकालपणा वाढत असून, यामुळे स्मार्ट सिटीचे स्वप्न भंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे अनधिकृत गुदाम केव्हा हटणार आणि नागरिक केव्हा मोकळा श्वास घेणार, असा उपरोधिक प्रश्न त्रस्त नागरिकांनी केला आहे. अंबड लिंक रोडवर असलेल्या भंगार बाजारासारखे स्वरूप वडाळागावातील भंगार गुदामांना प्राप्त होत चालले आहे . वडाळागाव शेतकरी आणि मजुरांची वस्ती म्हणून ओळखली जाते. सुमारे पस्तीस वर्षांपूर्वी या गावात शेती व्यवसाय होता. यामध्ये द्राक्ष, गुलाब आणि भाजीपाला असे उत्पादनाचे साधन होते. परंतु जमिनीस जसजसा भाव मिळत गेला तशी एक एक जमीन विकली गेली. सुमारे दहा हजार लोकांची वस्ती असलेल्या या गावात सुमारे वीस वर्षांपासून एकेक करून सुमारे तीस ते पस्तीस लहान-मोठे भंगाराचे गुदाम झाले आहेत. या भंगार गुदामांमध्ये शहरातील विविध भागातून जमा केलेला भंगार येथे दिवस व रात्री जमा केला जात आहे. नको असलेले भंगार येथेच जाळण्यात येत असल्याने त्यातून निघणारा धूर व दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांना श्वसनासह विविध विकारांना सामोरे जावे लागत आहे. तसेच भंगार व्यावसायिक नको असलेला भंगार माल फेकून देत असल्याने तो अस्ताव्यस्त पडून परिसरास बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. वाढत्या अनधिकृत भंगार गुदामांमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक वेळा समक्ष भेटून आणि निवेदन देऊनही अद्यापपर्यंत परिस्थिती ‘जैसे थे’च असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
वडाळागाव : प्रदूषणात वाढ; अतिक्रमणाने नागरिक त्रस्त भंगार गुदामांमुळे ‘स्मार्ट सिटी’ला खोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 12:55 AM
इंदिरानगर : वडाळागावातील अनधिकृत भंगार गुदामांच्या अतिक्रमणामुळे बकालपणा वाढत असून, यामुळे स्मार्ट सिटीचे स्वप्न भंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ठळक मुद्देउपरोधिक प्रश्न त्रस्त दहा हजार लोकांची वस्ती