नाशिक : मुंबईहून शिरपूरच्या गोल्ड रिफायनरीत सोने घेऊन जाणाऱ्या सिक्युरिटी वाहनाला अडवून त्यातील ५८ किलो सोन्याची लूट करणाऱ्या संशयितांपैकी सलीम व रामचरण अयोध्याप्रसाद मिश्रा या दोघा संशयितांची रेखाचित्रे ग्रामीण पोलिसांनी जाहीर केली आहे़ या दोन्ही संशयितांचा सोने लुटीत प्रत्यक्ष सहभाग असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे़ २४ एप्रिल रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील वाडीवऱ्हे शिवारात ही घटना घडली असून, जिल्'ातील ही सर्वांत मोठी लुटीची घटना आहे़ अंधेरी येथील सिक्वेल सिक्युअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे वाहन (एमएच ०२ सीई ४०१०) गुरुवारी रात्री ४० किलो सोने घेऊन शिरपूरच्या गोल्ड रिफायनरीमध्ये जात होते़ पहाटे ३ वाजेच्या सुमारास वाडीवऱ्हेजवळील लामसाहेब मळा, शेवाळी नाल्याजवळ पांढऱ्या रंगाची लोगान कारमधील (वरती लाल दिवा लावलेला) पाच दरोडेखोरांनी अडवली़ या पाचही जणांनी ड्रायव्हर व डिलिव्हरी असिस्टंटला पिस्तूलचा धाक दाखवून गाडीबाहेर काढून वाहनातील ५८ किलो सोन्याची लूट करून फरार झाले़ या लूट प्रकरणात वाडीवऱ्हे पोलिसांनी आतापर्यंत तिघा संशयितांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीही दिली होती़ या तिघांच्या चौकशीत त्यांनी गुन्'ातील मुख्य संशयितांमध्ये सलीम व रामचरण मिश्रा यांच्या सहभागाची माहिती समोर आली़ तसेच व्हॅनमध्ये एका संशयिताची राहिलेल्या पिशवीत त्याचे बँक पासबुक सापडल्याने या लुटीचे धागेदोरे उत्तर प्रदेशपर्यंत असल्याचे समोर आले़ त्यामुळे पोलिसांनी विविध ठिकाणी पथके पाठवून एका उत्तर प्रदेशमधून अटक केली होती़
वाडीवऱ्हे सोने लुटीतील संशयितांचे रेखाचित्र प्रकाशित
By admin | Published: May 16, 2015 1:16 AM