शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

कोका कोला कंपनीत वेतनवृद्धी करार

By admin | Published: December 22, 2015 10:35 PM

कोका कोला कंपनीत वेतनवृद्धी करार

सातपूर : अंबड येथील हिंदुस्थान कोका कोला कंपनीतील कामगारांना दरमहा ८०४० रुपयांची वेतन वाढ मिळवून देणारा यशस्वी वेतन वाढीचा करार करण्यात आल्याने कामगारांचे वेतन आता ३० ते ३३ हजारांपर्यंत होणार असल्याची माहिती सीटूचे सरचिटणीस डॉ. डी. एल. कराड यांनी दिली.हिंदुस्थान कोका कोला कंपनी व्यवस्थापन आणि सीटू संलग्न नाशिक वर्कर्स युनियन यांच्यात झालेल्या वेतनवाढीच्या करारानुसार कामगारांना दरमहा ८०४० रुपये मिळणार आहेत. यामध्ये ५०४० रु पये मूळ वेतनात तसेच विविध भत्त्यात ३०० रुपयांची वाढ मिळणार आहे. बदलत्या महागाई भत्त्यामुळे ३५०० वाढ मिळणार आहे. याव्यतिरिक्त दरवर्षी २४,३०० रु पये बोनस मिळणार आहे. तर ३०० रु पये दिवाळी भेट, कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी २ लाखांचा मेडिक्लेम विमा, गंभीर आजारासाठी ५ लाखांचा व अपघातासाठी ५ लाखांचा विमा संरक्षण लागू करण्यात आला आहे. सहल भत्ता म्हणून दरवर्षी ४५०० रु पये मिळणार आहेत.या करारावर कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने केदार सप्रे, एस. आर. देशमुख, ब्रिजेश जाधव, सीटूच्या वतीने सरचिटणीस डॉ. डी. एल. कराड, अध्यक्ष आर. एस. पांडे, उपाध्यक्ष सीताराम ठोंबरे, तुकाराम सोनजे, सदस्य मुस्ताक शेख, एस. जी. पवार, एच. बी. साळुंखे, विष्णू शिरसाठ, डी. एस. देशमुख आदिंनी स्वाक्षऱ्या केल्या. (वार्ताहर)