सिन्नर: माळेगाव औद्योगिक वसाहटीतील हिंदुस्तान युनिलिव्हर कारखान्यात कामगारांचा वेतनवाढीचा करार कंपनी व्यवस्थापन आणि सिटू प्रणित हिंदुस्तान युनिलिव्हर कामगार संघटना यांच्यात झाला. त्याचे स्वागत होत आहे.या करारानुसार कामगारांना कमीत कमी 10 हजार 165 रुपये व जास्तीत जास्त 11 हजार 250 रुपये वेतनवाढ मिळणार आहे. दरम्यान, सिन्नर माळेगाव औद्योगिक वसाहती मधील पुर्वीची ब्रुकबॉन्ड व सद्याची हिदुस्थान युनिलिव्हर या कंपनीत उत्पादन व उत्पादकता याबाबतही चर्चा होऊन उभय पक्षात एकमत झाले आहे . विशेष म्हणजे हा करार पूर्वीचा करार संपला त्या दिवशी करण्यात व्यवस्थापन व युनियनला यश आले आहे. करारावर व्यवस्थापनाच्या वतीने फॅक्टरी मॅनेजर अर्पण आनंद , मॅन्युफैक्चरिंग मॅनेजर फूड चरणजीत सिंग , एच.आर. मॅनेजर पवन कडलग , मॅन्युफैक्चरिंग मॅनेजर आईस्क्रीम उदित अग्रवाल , इंजिनीरिंग मॅनेजर डेबिड , श्रीवास्तव व युनियनच्यावतीने कॉमेड सिताराम ठोंबरे , राजेंद्र अहिरे योगेश अहिरे , राजू चौधरी , राजकुमार उगले , संदीप नाठे , सतीश डोमाडे , प्रकाश खैरनार यांनी स्वाक्षऱ्या केल्या.कंपनीने अनेक चढ-उतार पाहिले. सिन्नरचा हा कारखाना अडचणीत आला तेव्हा यातील काही कामगार खामंगाव व पुणे येथे हलवले होते आता मात्र शिप्ट झालेले कामगार व इतर प्रकल्पाचे कामगार सिन्नर च्या प्रकल्पात परत आणले आसून अधिक उत्पादनातही वाढले आहे. कामगारांनी कंपनीचा हिताचा विचार करून स्वतः बदल केल्याने व्यवस्थापनानेही सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कामगाराचा विचार केला.चौकट-कराराचे वैशिष्ट्ये-हा करार ४ वर्षासाठी आहे. त्याच बरोबर 6 रुपये प्रति पॉईंट या दराने महागाई भत्ता मिळणार आहे . या वेतनवाढीच्या कराराचा लाभ कंपनीतील 536 पर्मनंट कामगारांना होणार असून कामगारांचे कमीत कमी वेतन दरमहा 33,500 / - व जास्तीत जास्त वेतन दरमहा 50,500 / - होत आहे . कामगारांना दिवाळी अडव्हांस 15000 / - रुपये , अंत्यविधीसाठी 15000 / - रुपये देण्यात येणार आहेत . पहिल्या व दुसऱ्या पाळीतील कामगारांना नाश्ता सुरु करण्यात येणार आहे तसेच वार्षिक इन्क्रिमेंट मध्ये ही वाढ करण्यात आली आहे . तसेच कामगारांना कमीत कमी 23,000 / - व जास्तीत जास्त 26,000 / - रुपये बोनसही मिळणार आहे.कामगारांकडून स्वागत आणि आनंदकरार करण्यासाठी हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे एज्यहाँबेट रिलेशन्स साउथ एशिया हेड आनंद त्रिपाठी , एव आर.रिजनल हेड अमिताभ गौतम , सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व हिंदुस्तान युनिलिव्हर कामगार संघटनेचे अध्यक्ष डॉ.डी.एल.कराड यांनी मार्गदर्शन केले . यावेळी सिटूचे जिल्हा पदाधिकारी कॉ.संतोष कुलकर्णी , को हरिभाऊ तांबे , अँड . भूषण सातळे उपस्थित होते . सदर करार सर्व कामगारांना वाचून दाखविण्यात आला व त्याचे सर्वच कामगारांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले आणि आनंद व्यक्त केला .