विद्यमान सभापती भालचंद्र वाघ व उपसभापती बापू जाधव यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामे दिल्याने सुनील जाधव यांनी सभापतिपदासाठी रंजना वाघ व उपसभापतिपदासाठी रामदास बच्छाव यांच्या नावाची सूचना मांडली. संचालक रवींद्र वाघ, साहेबराव जाधव यांनी अनुमोदन दिल्याने सर्व सभासद व संचालक यांच्या उपस्थितीत निवडणूक बिनविरोध पार पडली.
यावेळी सोसायटीचे सचिव शिवा जाधव यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पहिले. यावेळी अभिमन्यू वाघ, मोहन वाघ, सुभाष वाघ, केवळ वाघ, दीपक वाघ, अशोक जाधव, उत्तम मोरे, रवींद्र वाघ, साहेबराव आहेर व संचालक मंडळ व सभासद उपस्थित होते.
===Photopath===
041220\04nsk_5_04122020_13.jpg
===Caption===
पिळ्कोस सोसायटीच्या सभापतीपदी रंजना वाघ व उपसभापती रामदास बच्छाव यांची निवड झाल्यानंतर आनंदोत्सव साजरा करताना शिवा जाधव, अभिमन्यू वाघ ,मोहन वाघ , साहेबराव जाधव ,सुभाष वाघ ,केवळ वाघ ,दीपक वाघ ,अशोक जाधव ,उत्तम मोरे ,रवींद्र वाघ ,साहेबराव आहेर ,अभिजित वाघ, संचालक व सभासद.०४ पिळकोस १