दिडोंरी : तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील उमराळे बु येथील शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जमिनी वाघाड धरणात गेल्या ४० वर्षापुवी शासनाने भुसंपादीत करून आज शेतकरी भुमिहीन झाले मात्र त्यांना अद्याप पूर्ण मोबादला व त्यांच्या पाल्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करण्यात आले नाही या विषयी वंदे मातरम सेनेतर्फत जिल्यांचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना निवेदन दिले तर मुख्यमंत्री यांच्या कार्यालयात देखिल निवेदन पाठविण्यात आल्याचे वंदे मातरम सेनेतर्फे सांगण्यात आले.नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालूक्यातील उमराळे बु येथील वाघाड धरणग्रस्त शेतकरी गेली ३५ वर्षापासुन मोबदल्यासाठी लढा देत आहे. मात्र त्यांना अद्याप न्याय मिळाला नाही. धरणग्रस्तांच्या पाल्यांना शासकीय सेवेत नोकरी मिळाली नाही. तसेच पूर्नवसन नाही वेळोवेळी संबधित मंत्री, अधिकारी, खासदार, आमदार यांना निवेदन देऊन न्याय मिळाला नाही. शेतकऱ्यांची मुले मोठी झाली तर न्याय मिळत नसल्याने अखेर २० शेतकरी बांधवांनी जलसमाधी आंदोलनचा निर्णय दिंडोरीचे तहसीलदार कैलाश पवार व पोलीस निरीक्षक अनिल कुमार बोरसे यांच्या आश्वासनानंतर जलसमाधी आंदोलन स्थगित करण्यात आले.मात्र या विषयावर विभागीय महसुल आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सुरज मांढरे हे वेळ देत नसल्याचा आरोप करत या अधिकाºयांची बदली करावी अशी मागणी म्हात्रे सह शेतकºयांनी केली या प्रश्नी शेतकºयांना न्याय देण्यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत शेतकरी आहेत. यावेळी सुकदेव थेटे, अनिल थेटे, संजय थेटे, शेखर तिडके, बाळूू खिरकाडे, रंगनाथ थेटे, निवृत्ती खिरकाडे, पोपट खिरकाडे आदि शेतकरी उपस्थीत होते.
वाघाड प्रकल्पग्रस्तांचे पालकमंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2020 3:49 PM
दिडोंरी : तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील उमराळे बु येथील शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जमिनी वाघाड धरणात गेल्या ४० वर्षापुवी शासनाने भुसंपादीत करून आज शेतकरी भुमिहीन झाले मात्र त्यांना अद्याप पूर्ण मोबादला व त्यांच्या पाल्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करण्यात आले नाही या विषयी वंदे मातरम सेनेतर्फत जिल्यांचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना निवेदन दिले तर मुख्यमंत्री यांच्या कार्यालयात देखिल निवेदन पाठविण्यात आल्याचे वंदे मातरम सेनेतर्फे सांगण्यात आले.
ठळक मुद्देशेतकरी भुमिहीन झाले मात्र त्यांना अद्याप पूर्ण मोबादला व त्यांच्या पाल्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करण्यात आले नाही