पंचवटी : दिंडोरी येथून नांदेड जिल्ह्यात पाठविलेला मालट्रक नादुरुस्त झाल्याचे सांगून मालट्रकमधील मद्यसाठा परस्पर रस्त्यात उतरवून लाखो रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी आडगाव पोलिसांनी सात संशयितांना अटक करून २८ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणात पंचवटीतील काही संशयितांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याने अपहार केलेल्या मद्यसाठ्याचे वाघाडी कनेक्शन असल्याचे बोलले जात असून, पोलिसांनीदेखील याबाबत माहिती जमा करण्याचे काम सुरू केले आहे.मालट्रकमधील मद्यसाठ्याचे बॉक्स एका अन्य चारचाकीत लपवून ठेवल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने व या प्रकरणात पंचवटीतील काही संशयितांचा समावेश असल्याने अपहारातील मद्यसाठ्याचे वाघाडी कनेक्शन असल्याचे बोलले जात आहे. अपहार केलेला मद्यसाठा हा वाघाडी परिसरात तसेच चोरी छुप्या पद्धतीने मद्याची विक्री करणाºया अवैध व्यावसायिकांनाही दिल्याची दाट शक्यता असल्याचे पोलिसांनी बोलून दाखविले असल्याने यापूवीर्ही संशयितांनी अशाचप्रकारे मद्यसाठ्याचा अपहार केल्याची शक्यता असल्याने पोलीस त्यादृष्टीने तपास करीत आहेत.चालकाला ताब्यात घेऊन चौकशीपंधरवड्यापूर्वी दिंडोरीतील मद्य कंपनीतून नांदेडला मालट्रकने मद्यसाठा पाठविलेला होता; मात्र मद्यसाठा नांदेडला न नेता तो मालट्रक पंचवटीतील एका महाविद्यालयाजवळ नेऊन त्यातील ३७६ बॉक्स परस्पर गायब करून लाखो रुपयांच्या मद्यसाठ्याचा अपहार मालट्रक चालक, मालक, क्लीनर व त्यांच्या अन्य सहकाºयांनी केला होता. संबंधित ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाने मंठा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर संबंधित चालकाला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर अन्य सहकाºयांच्या मदतीने अपहार केल्याचे उघड झाले होते.
जप्त मद्यसाठ्याचे वाघाडी कनेक्शन?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 11:59 PM