वलखेड फाटा ते निगडोळ या रस्त्यावर तर मोठ्या प्रमाणात खड्डे व चिखल झाल्याने प्रवासी वाहन कसे चालवावे, असा प्रश्न चालकांसमोर निर्माण झाला आहे.
सध्या पावसाळ्यात रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. खड्डे बुजवायला माती मिश्रित मुरूम टाकल्याने रस्ता चिखलमय झाला आहे. या रस्त्याने जर मोटारसायकलीने प्रवास करायचा असेल तर अजून एखादा ड्रेस सोबत ठेवावा लागत आहे. रस्त्यांवरील सर्व चिखल अंगावर उडत असल्याने अशी शक्कल लढवावी लागत आहे.
कोट...
सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी यांनी वलखेड ते निगडोळ या रस्त्याकडे लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करावा. या रस्त्याने प्रवास करणारे शेतकरी, नागरिक यांची अडचण दूर करावी. जनतेला सध्या योग्य अशा रस्त्याची आवश्यकता असल्याने याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
- शरद मालसाने, उपसरपंच, निगडोळ
फोटो - ०१ वलखेड रोड
वलखेड फाटा ते निगडोळ रस्त्याची खड्डे व चिखलाने झालेली दुरवस्था.
010821\01nsk_5_01082021_13.jpg
वलखेड फाटा ते निगडोळ रस्त्याची खड्डे व चिखलाने झालेली दूरवस्था.