कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने फैलावत असल्यामुळे वैद्यकीय मदत मिळविताना नागरिकांची दमछाक तर होतच आहे; मात्र ही मदत पुरविणाऱ्या शासकीय वैद्यकीय यंत्रणाही आता कमी पडतानाचे चित्र पाहावयास मिळत आहे. नाशिक जिल्ह्यात एकूण १५ तालुके असून यामध्ये आदिवासी तालुक्यांची संख्या आठ आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी ग्रामीण भागातसुद्धा कोरोनाची परिस्थिती कितीतरी पटीने भयंकर असल्याचे चित्र आहे. महिनाभरापासून ग्रामीण भागात कोरोनाबाधितांचा मृत्युदरसुद्धा वाढलेला दिसून येतो. तसेच शहरी भागात मागील वर्षाच्या तुलनेत कोरोनाने दुप्पट हाहाकार उडविला आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागल्याने रुग्णवाहिकांची मदत रुग्णांपर्यंत पोहोचविताना ‘१०८’च्या यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागत असून या रुग्णसेवा देणारे डॉक्टर, रुग्णवाहिकाचालक (पायलट) यांची कसोटी लागत आहे.
---इन्फो---
२० हजार २१५ कोविड रुग्णांची वाहतूक
मागील वर्षी पहिला रुग्ण जेव्हा नाशकात आढळला, तेव्हापासून आजपर्यंत ‘१०८’ रुग्णवाहिकेतून तब्बल २० हजार २१५ कोरोनाबाधित रुग्णांची वाहतूक केली आहे. एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांना वैद्यकीय मदत पोहोचविणे, तर दुसरीकडे घात, अपघातग्रस्तांना उपचारासाठी रुग्णालयापर्यंत पोहोचविणे तसेच गर्भवती महिलांनाही प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्याचेही आव्हान या रुग्णवाहिकांनी जिल्ह्यात लीलया पार पाडले.
---इन्फो---
२० ते ४० मिनिटांत रुग्णवाहिका होतेय हजर
१) कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे रुग्णवाहिका मिळण्यास उशीर होऊ लागला आहे. कॉल केल्यानंतर वेटिंग लागत असून सुमारे २० ते ४० मिनिटांपर्यंत रुग्णवाहिका रुग्णाच्या दारापर्यंत पोहोचते.
२) वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आता रुग्णवाहिकांची संख्याही अपुरी पडताना दिसत आहे. शहरात कोविड रुग्णांची वाहतूक करण्यासाठी ३ रुग्णवाहिका राखीव आहेत; मात्र वेटिंग वाढू लागल्याने अन्य रुग्णवाहिकांद्वारेही कोरोनाग्रस्तांची वाहतूक ‘तत्काळ’मध्ये केली जात असल्याचे विभागीय व्यवस्थापक डॉ. अभय सोनवणे यांनी सांगितले.
३) कोविड रुग्ण वाहतूक केल्यानंतर तत्काळ या रुग्णवाहिका सोडियम हायपोक्लोराइडची फवारणी करत सॅनिटाइझ केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात एकूण १८ रुग्णवाहिका कोविडसाठी राखीव आहेत. मालेगावकरिता ३, उर्वरित ग्रामीण भागासाठी १२ रुग्णवाहिका धावत आहेत.
---पाॅइंटर्स--
जिल्ह्यातील एकूण रुग्णवाहिका- ४६
दररोज येणारे कॉल्स- ३००
शहरातून येणारे कॉल्स- ६० टक्के
----
कोणत्या महिन्यात किती रुग्णांची वाहतूक - (आलेख)
महिना- कोरोना रुग्ण अन्य रुग्ण
जानेवारी- - ---- २,७१६
फेब्रुवारी-- ----- २,४७६
मार्च -- ---------------- ३,५९४
----
फोटो आर वर १९ॲम्ब्युलन्स/ १९ॲम्ब्युलन्स१/ १९टेलिफोन/१९कोरोना नावाने सेव्ह आहे.
डमी फॉरमेटसुध्दा १९ॲम्ब्युलन्स १०८ नावाने सेव्ह.