इंदिरानगर : जनतेच्या कामांचा निपटारा करणाऱ्या अनेक शासकीय कार्यालयांना स्वमालकीची जागा अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नसल्याने अनेक कार्यालये खासगी भाड्याच्या जागेत सुरू आहेत, तर काही कार्यालये शासनाच्याच अन्य विभागाच्या जागेत कार्यरत असल्याने त्यांनाही भाडे आकारले जात आहे. दरमहा या शासकीय कार्यालयांना भाड्यापोटी लाखो रुपये मोजावे लागत आहे. एकीकडे शासनाच्या मालकीच्या अनेक जागा पडीक असताना दुसरीकडे शासनाचीच कार्यालये भाड्याच्या जागेत कार्यरत आहेत.दूरध्वनी केंद्रही भाड्याच्या बंगल्यातसुमारे पंधरा वर्षांपूर्वी इंदिरानगरसह परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार महारुद्र कॉलनीतील बंगला भाडेतत्त्वावर घेण्यात येऊन तेथे दूरध्वनी केंद्र सुरू करण्यात आले. दूरध्वनी व भ्रमणध्वनी काळाची गरज आहे. परिसरात दूरध्वनी ग्राहकांची संख्या हजारोच्या संख्येत आहे. या दूरध्वनी केंद्रातून नवीन जोडणी आणि तक्रार निवारण करण्यात येते. दूरध्वनी केंद्राच्या जागेतच मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री ठेवण्यात आली असून, कर्मचाºयांना अपुºया जागेत बसण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. कार्यालयाच्या अपुºया जागेमुळे नागरिकांना धड उभेदेखील राहता येत नाही. दूरध्वनी ग्राहकांकडून दूरध्वनीच्या बिलाद्वारे लाखो रुपयांचा महसूल मिळवूनही सुमारे पंधरा वर्षांपासून दूरध्वनी केंद्र स्वमालकीच्या जागेच्या प्रतीक्षेत आहे.स्वमालकीच्या जागेची प्रतीक्षा जनतेच्या सोयीसाठी शासकीय कार्यालये सुरू करण्यात आली असली तरी, या कार्यालयांना पुरेशी जागा नसल्यामुळे येथील कार्यरत कर्मचारी, अधिकाºयांच्या गैरसोयीबरोबरच कामे घेऊन येणाºया अभ्यागतांनाही गैरसोयीचा सामना करावा लागतो. इंदिरानगर परिसरात शासकीय मालकीच्या अनेक जागा वर्षानुवर्षे पडून असून, संबंधित कार्यालयाने या जागा मिळविण्यासाठी व स्वमालकीचे कार्यालय उभारण्यासाठी निधीची तरतूद केल्यास दरमहा भाड्यापोटी होणारा खर्च वाचण्यास मदत होणार आहे.अपार्टमेंटमध्ये पोस्ट कार्यालयसंगणक आणि भ्रमणध्वनीच्या जमान्यात आजही पोस्टाचे महत्त्व तितकेच आहे. पॅन कार्ड, वाहन परवाना, आधार कार्ड, नोकरीचे अपॉईमेंट यांसारखी सरकारी कामे पोस्टाद्वारेच होतात. इंदिरानगर परिसरात सुमारे वीस वर्षांपासून पोस्टाचे उपकार्यालयाची मागणी अखेर सुमारे सहा वर्षांपूर्वी पूर्ण झाली. जॉगिंग ट्रॅकलगत एका खासगी अपार्टमेंटच्या छोट्या खोलीत पोस्टाचे उपकार्यालय सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे तेथे येणाºया नागरिकांना उभे राहण्यासदेखील जागा नाही.
उपकार्यालयांना अस्तिवाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 12:57 AM