नाशिक-नाशिकरोड जवळील ओढा येथील मातोश्री कॉलेज मधील विद्यार्थ्यांचे बससच्या अभावी हाल होत आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसनेही त्यांनी सेवा मिळत नाही आणि महापालिका बससेवा सुरु कधी करणार याचेही उत्तर मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. एकही बस या कॉलेज पर्यंत जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवासासाठी पायपीट करावी लागत आहे. यात मुलींची संख्या मोठी आहे.ही बाब लक्षात घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नाशिक रोड शाखेने या संदर्भात बससेवा चालू करण्यासाठी निवेदन पंचवटी बस डेपो येथील आगार व्यवस्थापकांना दिले. या समस्येची दखल घेत लवकरात लवकर कॉलेजच्या वेळा लक्षात घेऊन त्या वेळांना तरी किमान बसेस उपलब्ध करुन द्याव्यात अशी मागणी करण्यात आली.यावर त्वरित कार्यवाही करण्याचा आग्रह धरण्यात आला. यावेळी मातोश्री कॅम्पस प्रमुख संकेत सानप, आदित्य महाले,महेश महाले,शुभम पडोळ,तुषार हिरे,वैभव तांबे,संकेत अनप इ. कार्यकर्ते उपस्थित होते .
ओढ्याच्या विद्यार्थ्यांना बससेवेची प्रतिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 4:01 PM
विद्यार्थ्यांना प्रवासासाठी पायपीट
ठळक मुद्दे विद्यार्थ्यांना प्रवासासाठी पायपीट