नाशिक : महिलांचे हक्काचे व्यासपीठ म्हणून मनामनात घर करून बसलेल्या लोकमत सखी मंचची २०१७ या वर्षाची सदस्यता नोंदणीची प्रतीक्षा आता संपली आहे. १३ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत जिल्ह्यात सर्वत्र केंद्रनिहाय सदस्य नोंदणीचे आयोजन करण्यात आले आहे. ‘लोकमत सखी मंच’ने महिलावर्गात स्वतंत्र असे स्थान निर्माण केले आहे. दरवर्षी सखी मंचमार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना भरभरून प्रतिसाद लाभत आला आहे. सखींच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेले लोकमत सखी मंच आज राज्यभरात यशाच्या शिखरावर पोहोचले आहे. विविध व आकर्षक कार्यक्रम, सोबत मोफत भेटवस्तूंची बरसात हे यंदाच्या सदस्यत्व नोंदणीचे आकर्षण आहे. मोठ्या संख्येने सखींनी सदस्यत्व घेऊन सखी मंच परिवारात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
५१ भाग्यवंतांना दिल्ली हवाई सफरची संधी
सदर नोंदणीपोटी गतवर्षीचे ओळखपत्र जमा करणाऱ्या सदस्यांना रु. ३००, तर नूतन सदस्यांना वर्षभरासाठी रु. ३५० शुल्क भरावे लागणार आहे. उपरोक्त शुल्कात महिलांना सखी मंचचे आकर्षक ओळखपत्र, आकर्षक भेटवस्तू- ५४० रुपये किमतीचा अंजली कंपनीचा फ्राय पॅन, १ लाख रुपयांचा अपघात विमा, ‘अशा वेळी’ ही उपयुक्त मार्गदर्शक पुस्तिका, रामबंधू उडदाच्या पापडाचे पॅकेट, गोल्डन धमाका योजनेची प्रवेशिका आदि देण्यात येणार आहे. याशिवाय भाग्यवंत सोडतीद्वारे ५१ भाग्यवंत सभासदांना राज्यस्तरीय दिल्ली हवाई सफरची संधी, तसेच सदस्यांसाठी काढण्यात येणाऱ्या गोल्डन धमाका भाग्यवंत सोडतीद्वारे पहिले बक्षीस ५१ हजार रुपयाचा सोन्याचा दागिना, दुसरे बक्षीस ३१ हजार रुपयाचा सोन्याचा दागिना, तिसरे बक्षीस २१ हजार रुपयांचा सोन्याचा दागिना, चवथे बक्षीस ११ हजार रुपयाचे सोन्याचे दागिने (५), याशिवाय भाग्यवंत सोडतीद्वारे अनेक बक्षिसे प्राप्त करण्याची संधी राहील. कार्यक्रम स्थळीच सखी मंच सदस्यत्व नोंदणी २०१७ ची खास व्यवस्था करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी रोशन पठाडे- ९०२८६९०६९२ आणि विशाल रोकडे- ८६९८६९९९९१ या क्रमांकावर संपर्क साधावा.
‘हसवाफसवी’चे खास आयोजन
क्षणाक्षणाला हास्याचे स्फोट उडवणारा, खो खो हसवणारा अस्सल मराठमोळा कॉमेडी शो अर्थात ‘हसवाफसवी’चे खास आयोजन सखींसाठी करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध कॉमेडियन शहाजी भोसले हे सखींना मनमुराद हसण्याची संधी देणार आहेत. याशिवाय ११ भाग्यवंत सखींना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधीही या कार्यक्रमात आहे. हा कार्यक्रम सोमवार, दि. १३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता मराठा दरबार, मालेगाव येथे; मंगळवार, दि. १४ फेब्रु. रोजी दुपारी ३ वाजता सार्वजनिक वाचनालय, सिन्नर येथे; बुधवार दि. १५ फेब्रु. रोजी दुपारी ३ वाजता वाणी समाज मंगल कार्यालय, सटाणा येथे; गुरुवार, दि. १६ फेब्रु. रोजी दुपारी ३ वाजता आर. जी. चांडक हॉल, इगतपुरी येथे; शुक्रवार, दि. १७ फेब्रु. रोजी दुपारी ३ वाजता गोठी कॉम्लेक्स, घोटी येथे; शनिवार दि. १८ फेब्रु. रोजी दुपारी ३ वाजता सौभाग्य मंगल कार्यालय, पिंपळगाव बसवंत येथे, रविवार, दि. १९ फेब्रु. रोजी दुपारी ३ वाजता बालाजी मंदिर, ओझर येथे; सोमवार, दि. २० फेब्रु. रोजी दुपारी ३ वाजता कळवण मर्चंट बॅँक हॉल, कळवण येथे हे कार्यक्रम होणार आहेत.
‘झटपट स्रॅक्स स्पेशल’चे आयोजन; ११ भाग्यवंत सखींना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी
जिझी व्हील, कॉर्न लॉलीपॉप, हरियाली कचोरी, पिंक कटलेट, सिंगापुरियन नुडल्स असे पदार्थांचे नाव ऐकून तोंडाला पाणी सुटले ना! हे पदार्थ सखी मंच सदस्यांना प्रत्यक्षात शिकायला मिळणार आहेत. प्रसिद्ध कुकिंग तज्ज्ञ आरती कटारिया या कार्यक्रमात पदार्थ करायला शिकवणार आहेत. कार्यक्रमास उपस्थित सखींपैकी ११ भाग्यवंत सखींना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. मैत्रिणींसह या कार्यक्रमात सहभागी होता येणार असून, सोबत नोटबुक व पेन आणावे असे कळविण्यात आले आहे. हा कार्यक्रम सोमवार, दि.१३ फेब्रु. रोजी दुपारी ३ वाजता याज्ञवल्क्य सभागृह, त्र्यंबकेश्वर; दि, १४ रोजी येथे चांदवड येथे संताजी मंगल कार्यालय, बुधवार, दि. १५ फेब्रु. रोजी दुपारी ३ वाजता जे. टी. के. डी. जैन धर्मशाळा, नांदगाव येथे, गुरुवार, दि. १६ फेब्रु. दुपारी ३ वाजता न्यू बालाजी मंदिर, मनमाड येथे, शुक्रवार, दि. १७ फेब्रु. रोजी दुपारी ३ वाजता कॉँग्रेस भवन, निफाड येथे; शनिवार, दि. १८ फेब्रु. रोजी दुपारी ३ वाजता शिवकमल मंगल कार्यालय, लासलगाव येथे; रविवार दि. १९ फेब्रु. रोजी दुपारी ३ वाजता लक्ष्मीनारायण मंदिर, येवला येथे हे कार्यक्रम होणार आहेत.