नाशिक : उपनगर येथील विघ्नहर्ता नगर येथील अक्षरधाम सोसायटी परिसरात ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली. येत्या १५ ऑगस्टपर्यंत हा उपक्रम राबविण्यात येणार असून, दर आठवड्याला वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
भाजीपाल्याची लांबी वाढतीच
नाशिक : जेलरोड येथील नोटप्रेस समोर भरणाऱ्या भाजी बाजाराची दिवसेंदिवस लांबी वाढत आहे. प्रेसपासून थेट सेंट फिलोमीना स्कूलपर्यंत या बाजाराची लांबी वाढली आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांबरोबरच अनेक भरेकरीही व्यवसाय करतात. ग्राहकांचाही त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
उघड्यावर मास विक्रीची तक्रार
नाशिक : शहरातील अनेक भागात उघड्यावर मास विक्री होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. अनेक रस्त्यांवरच मास विक्रीची दुकाने आहेत. यामुळे ठिकाणाहून जाणाऱ्या काही नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. याबाबत कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.
पर्यटन स्थळांवर गर्दी
नाशिक : कोरोनाचे निर्बंध शिथिल होताच शहर परिसरातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. काही ठिकाणी यामुळे कोरोना नियमांकडे दुर्लक्ष होत आहे. त्र्यंबकेश्वर, पहिणे या परिसरात शनिवार, रविवार आणि सुटीच्या दिवशी गर्दी होत असल्याचे दिसते.