लोहोणेर : डी.व्ही. पी. ग्रुप संचलित धाराशिव कारखान्याने भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतलेल्या वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याला सन २०१८-१९ च्या गळीत हंगामासाठी पुरवठा केलेल्या बहुसंख्य ऊस उत्पादकांचे पेमेंट अद्यापही खात्यावर जमा झाले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.ऐन दुष्काळी परिस्थितीत सुमारे १२ ते १४ महिने जतन केलेला ऊस शेतकºयांनी वसाकाला पुरवला. दरम्यान, धाराशिव कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील व संचालक मंडळाने कारखान्याच्या बॉयलर व गव्हाण पूजनाच्या दिवशी शेतकºयांना आश्वस्त केले होते. नाशिक जिल्ह्यातील अन्य कारखाने जो भाव देतील त्यापेक्षा किमान एक रु पया तरी जास्त भाव देण्यात येईल. तसेच उस गाळपास आल्याबरोबर काट्यावर धनादेशाने पेमेंट अदा केले जाईल, असे स्पष्ट करण्यात आलेहोते.सुरुवातीला १५ दिवस काट्यावर रोख २००० रुपये प्रतिटन प्रमाणे बिल अदा केले गेले असले तरी शेजारील द्वारकाधीश कारखान्याने मात्र २३७० रुपये प्रती टनाप्रमाणे ऊस बिल अदा केले. त्यामुळे वसाकाला ऊस पुरवठा केलेल्या शेतकºयांनी वरील ३७१ रुपयांची मागणी केली असता बँक उचल देत नसल्याचे कारण पुढे करत टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे.जानेवारीनंतर पुरवठा केलेल्या उसाचे पेंमेट अद्याप ही शेतकºयांच्या खात्यावर वर्ग झाले नसून कारखान्याने अदा केलेले ऊस बिलांचे धनादेश वटत नसल्याची तक्रार साक्री तालुक्यातील मलाजे येथील ऊस उत्पादक शेतकरी राजेंद्र आनंदा सोनवणे यांनी केली आहे. दरम्यान, वसाका कामगारांच्या काम बंद आंदोलनास देखील सुमारे १५ दिवसाचा कालावधी उलटला तरी अद्याप प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने कामगारांनी नाराजी व्यक्त केली आहे.कायदेशीर कार्यवाही करणारकाही शेतकºयांचे धनादेश वटत नसल्यामुळे कारखाना प्रशासना विरोधात असंतोष निर्माण झाला असून, वसाकास पुरवठा केलेल्या उसाचे बिल अदा न केल्यास व धनादेश न वटल्यास कायदेशीर कार्यवाहीचा इशारा ऊस उत्पादक संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रभाकर पाटील, राजेंद्र सोनवणे, लक्ष्मण निकम, राजेंद्र जाधव, त्र्यंबक पवार आदी ऊस उत्पादकांनी दिला आहे.
वसाका ऊस पुरवठादारांना पेमेंटची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2019 1:01 AM
लोहोणेर : डी.व्ही. पी. ग्रुप संचलित धाराशिव कारखान्याने भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतलेल्या वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याला सन २०१८-१९ च्या गळीत हंगामासाठी पुरवठा केलेल्या बहुसंख्य ऊस उत्पादकांचे पेमेंट अद्यापही खात्यावर जमा झाले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.
ठळक मुद्देऊस उत्पादकांचे पेमेंट अद्यापही खात्यावर जमा झाले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष