खमताणे : बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील खमताणे, मुंजवाड, चौधांणे, निकवेल, जोरण, तिळवण, कंधाणे, वटार, विचुरे, कपालेश्वर , केरसाने आदि गावांमध्ये जुन संपला तरी अजुन पावसाने हजेरी न लावल्याने बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.आज पाऊस येई वातावरण शे, अशा अपेक्षेने बळीराजा रोज आकाशाकडे बघतो. मात्र वर्षभर पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहायची, मात्र मृग नक्षत्र सुरू झाले, की पावसाच्या सरी येत असतात. त्यामुळे हा पाऊस असाच पडेल म्हणून शेतीच्या मशागतीला सुरूवात करतात. मात्र पाऊस गायब होत असल्यामुळे शेतकरी दरवर्षी खचत आहे. आता पावसाळा म्हणावे की उन्हाळा अशी स्थिती बळीराजाची झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वरूणराजाच्या बळीराजाच्या शेतात यावे त्याला समृद्ध करावे यासाठी येरे येरे असे म्हणण्याची वेळ आली आहे.गेल्या वर्षी ही पावसाळा कमीच झाल्याने संपूर्ण वर्ष पाण्याअभावी शेती व्यवसायावर संकट ओढावले . विहिरींनी तळ गाठल्याने जनावरांचा चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. बळीराजाला मॉन्सूनने यंदा मात्र वाट पाहायला लावली आहे. यामुळे पेरणीसाठी शेती तयार करूनही पावसाअभावी शेतकº्यांना खरीप हंगामातील पेरणी करता येत नाही.( खमताणे : परिसरातील गावांत पाऊस न झाल्याने अध्याप ओसाड असलेले रान )(01खमताने रेन)
पेरण्यांसाठी पावसाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 3:57 PM
खमताणे : बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील खमताणे, मुंजवाड, चौधांणे, निकवेल, जोरण, तिळवण, कंधाणे, वटार, विचुरे, कपालेश्वर , केरसाने आदि गावांमध्ये जुन संपला तरी अजुन पावसाने हजेरी न लावल्याने बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.
ठळक मुद्दे जुन उलटला: पावसाच्या हूलकावणीने शेतकरी चिंतेत. जो दिवस उगतो तो कोरडाच जात आहे. त्यामुळे बळीराजा पूर्ण पणे हतबल झाला आहे. परिसरात रोहिणी, मृगापाठोपाठ, आर्द्रा नक्षत्रही कोरडे जाण्याच्या मार्गावर असुन अद्यापही पेरणी योग्य पाऊस न झाल्याने शेतकरीवर्गात चिंते