शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: तावडे आलेल्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
2
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
3
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
6
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
7
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
8
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
9
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
10
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
11
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
12
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
13
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
14
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
15
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
16
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
17
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
18
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
19
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
20
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…

शाळा विद्यार्थ्यांच्या प्रतिक्षेत; पालकवर्ग अजुनही संभ्रमात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 8:58 PM

नांदगाव : १५ जून रोजी मुलांच्या किलबिलाटाने गजबजणाऱ्या शाळा आज प्रथमच शांत आहेत. गेल्या काही वर्षांत शाळेच्या पहिल्या दिवशी समारंभपूर्वक विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करताना गावातले वातावरण बदलून जाते असे. यावर्षी कोरोनाच्या भीतीमुळे शाळेचा परिसर विद्यार्थीविना ओकाबोका झाला. गेले पंधरा दिवस साफसफाईच्या निमित्ताने शाळा सुरू होणार असल्याचे संकेत दिले गेले होते.

नांदगाव : १५ जून रोजी मुलांच्या किलबिलाटाने गजबजणाऱ्या शाळा आज प्रथमच शांत आहेत. गेल्या काही वर्षांत शाळेच्या पहिल्या दिवशी समारंभपूर्वक विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करताना गावातले वातावरण बदलून जाते असे. यावर्षी कोरोनाच्या भीतीमुळे शाळेचा परिसर विद्यार्थीविना ओकाबोका झाला. गेले पंधरा दिवस साफसफाईच्या निमित्ताने शाळा सुरू होणार असल्याचे संकेत दिले गेले होते. मात्र रविवारी सायंकाळी पुढचा शासन आदेश येईपर्यंत शिक्षकांनी घरूनच आॅनलाइन डिजिटल माध्यमातून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात करावी, असा जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांचा मेसेज आल्याने शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली नाही.--------------------------मुलांना शाळेत पुढील सूचना येईपर्यंत बोलवायचे नाही, अशा सूचना शिक्षकांना दिल्या असून त्यांनी आॅनलाईन शिक्षण द्यावयाचे आहे. ६२ पाठ आॅनलाइन पद्धतीने झाले आहेत. आज वेगळा आदेश नसता तर १०० टक्के शिक्षक शाळेत गेले असते. पाठ्यपुस्तके तालुकास्तरावर उपलब्ध झाली असून, दोन दिवसात त्यांचे वाटप करण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी नंदा ठोके यांनी दिली.शैक्षणिक दिंडी काढून, पालखी सजवून, गुलाबपुष्प देऊन, मिरवणुकीने विद्यार्थ्यांचा पहिल्या दिवशी शाळेत प्रवेश होत असे. पटसंख्या पूर्ण हजर राहावी. यासाठी शाळाशाळांत चढाओढ लागलेली असे. पहिल्या दिवशीचा पोषण आहार सकस व चवदार असावा याकडे लक्ष पुरवले जात असे. पंधरवड्यात शाळा सफाई झाली; पण आहारासाठी लागणारे तांदूळच अद्याप प्राप्त झाले नाहीत.तालुक्यात जिल्हा परिषद व खासगी शाळा मिळून पहिली ते बारावीपर्यंत सुमारे सहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. खासगी शाळातील ७० ते ८० टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांकडे अ‍ॅनड्रॉईड मोबाईल आहेत. गेले दोन महिने अनेक शाळांनी त्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवले. जिल्हा परिषदेच्या शाळात १६,३०० विद्यार्थी शिक्षण घेत असून तालुकास्तरीय सर्वेक्षणानुसार केवळ ४५०० पालकांकडे स्मार्टफोन आहेत.निर्जंतुकीकरण, सफाई केल्यानंतर शाळा सुरू होतील असा मेसेज पालकापर्यंत गेला होता. परंतु कोरोनाविषयी असलेले अनेक सामाजिक नियम कसे पाळता येतील याबद्दल शिक्षक व पालक यांच्यात संभ्रम आहे. शिक्षण विभागातले वरिष्ठ, शासकीय आदेशाची वाट बघत आहेत. शाळा केव्हा सुरू करायच्या याचे आदेश काही दिवसात निघतील, असे नाशिक शिक्षणाधिकारी यांनी कळवले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक