इंदिरानगर कक्ष कार्यालयाअंतर्गत सुमारे २५ हजार ग्राहक आहेत. भारतनगर सबस्टेशनमधून भारतनगर, शिवाजीवाडी, विनयनगर, साईनाथनगर, दीपाली नगर, सूचितानगर, वडाळागाव, कमोदनगर, जयदीपनगरसह परिसरास विद्युतपुरवठा करण्यात येतो. तसेच पाथर्डी सब स्टेशनमधून वडाळागाव, इंदिरानगर, मेहबूबनगर, समर्थनगर, सराफनगर, शरयूनगर, पांडवनगरी, कैलासनगर, सार्थकनगर, राजीवनगर, चेतनानगर, राणेनगर, श्री राजसारथी सोसायटी, रथचक्र सोसायटी, महारुद्र कॉलनी, अरुणोदय सोसायटी, मानस कॉलनी, देवदत्त सोसायटी, जिल्हा परिषद कॉलनी, आत्मविश्वास सोसायटीसह परिसराला विद्युतपुरवठा करण्यात येतो. सुमारे दहा वर्षांपासून इंदिरानगर परिसरात विद्युतपुरवठा खंडित होण्याचे प्रकार सातत्याने घडत असल्याने नागरिक हैराण होत आहेत.
भारतनगर व पाथर्डी सबस्टेशनमध्ये दिवसागणिक वाढणार्या अपार्टमेंट व सोसायट्यांबरोबरच वीजग्राहकांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त विजेची मागणी वाढली आहे. त्यामुळे परिसरातीतल वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. परिसरात वारंवार विजेच्या लपंडावामुळे अनेक वेळेला विद्युत उपकरणे नादुरुस्त झाले आहे. त्यामुळे नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. तातडीने परिसरात सबस्टेशन केल्यास वीजपुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल.