देसराणे : कळवण तालुक्यासह पुनद खोºयात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसह बियाणे विक्रेते यांच्यात चिंतेचे वातावरण पसरले असुन जुन मिहना उलटून ही ह्या भागात जोरदार पाऊस नसल्याने खरीप हंगाम वाया जातो की काय अशी भीती निर्माण झाली आहे.कळवण तालुक्यासह पुनद खोºयात खरीप पेरणी लायक पाऊस पडत नसल्याने शेतकºयांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. परिसरातील शेतकºयांनी खरीप पेरणीसाठी आपल्या शेतीची मशागत करून ठेवली आहे. मात्र पाऊस नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.कळवण तालुक्यातील व पुनद खोºयातील अनेक शेतकºयांच्या विहिरींनी तळ गाठला असुन पाण्याचे स्रोत दिवसेंदिवस कमी होऊ लागले आहे, त्यामुळे शेतकरी विहिरींचे खोदकाम करताना दिसुन येत आहे. तर काही शेतकरी पाण्याचा शोध घेऊन जमिनीमध्ये बोअर करीत आहे. व आपली पीके जगवन्यासाठी धडपड करीत आहे विहिरींना पाणी नसल्याने व पावसाळा सुरु होऊन एक महिन्याचा कालावधी गेला असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.गेल्या वर्षी ही पावसाळा कमीच झाल्याने संपूर्ण वर्ष पाण्याअभावी शेती व्यवसायावर संकट ओढावले. विहिरींनी तळ गाठल्याने जनावरांचा चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पेरणीसाठी शेती तयार करूनही पावसाअभावी शेतकºयांना खरीप हंगामातील पेरणी करता येत नाही.पाऊसाळ्यातील रोहिणी व मृग ही दोन्ही नक्षत्रे ही संपली तरी ही कळवण तालुक्यासह परिसरात पाऊसाची एकही सरी आलेली नाही, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. तर पिण्यास व जनावरांसाठी पाणी उपलब्ध करणे ही दिवसेंदिवस अवघड होतं चालले आहे. मिळेल तेथे पाणी उपलब्ध करण्यासाठी महिला वर्गाला चांगलीच कसरत करावी लागत आहे.(फोटो ०२ देसराणे, ०२ देसराणे १)
तालुक्यासह पुनद खोऱ्यात दमदार पावसाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 9:12 PM
देसराणे : कळवण तालुक्यासह पुनद खोºयात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसह बियाणे विक्रेते यांच्यात चिंतेचे वातावरण पसरले असुन जुन मिहना उलटून ही ह्या भागात जोरदार पाऊस नसल्याने खरीप हंगाम वाया जातो की काय अशी भीती निर्माण झाली आहे.
ठळक मुद्देकळवण : जून उलटूनही पाऊस नाही; खरीप पेरण्या खोळबल्या