पेठ : गत दीड वर्षापासून कोरोना विरुद्धच्या लढाईत सर्वच फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांसोबत राज्यातील प्राथमिक शिक्षकही आपला जीव धोक्यात घालून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांमध्ये सहभागी होत असताना शासनाने दिलेल्या कोविड विमा कवच मिळवण्याची मात्र अजूनही शिक्षकांना प्रतीक्षा आहे. किमान दुसऱ्या लाटेत तरी शिक्षकांना ५० लाखांचे विमा कवच लागू करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
नाशिक जिल्ह्यात साधारण बारा हजार प्राथमिक शिक्षक असून, मागील वर्षापासून शाळा बंद असल्या तरी ग्रामीण व आदिवासी भागातील वाडीवस्तीवर जाऊन विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवले. एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना गावातील गल्लीबोळात ओट्यावर, मंदिरात जेथे शक्य असेल तेथे अध्यापनाचे काम शिक्षकांनी केले. यामध्ये अनेक शिक्षकांना कोरोनाची बाधा झाली तर अनेकांना आपला जीवही गमवावा लागला. लसीकरण केंद्र, कोविड सेंटर, प्रतिबंधित क्षेत्र, आपत्कालीन मदत कक्ष आदी ठिकाणी शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्यामुळे कोरोनाच्या लढाईत शिक्षकांवरील जबाबदारीचा शासनाने विचार करावा, अशी मागणी होत आहे.
---------------------
जिल्हा सीमा तपासणी नाक्यावर शिक्षक तैनात
कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेचा एक भाग म्हणून दीड वर्षापासून नाशिक जिल्ह्याच्या सीमारेषांवर विशेष तपासणी नाके सुरू करण्यात आले असून, या ठिकाणी २४ तास पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत शिक्षक तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे दिवसभर व रात्रीच्या वेळी अनेक प्रवास करणाऱ्या रुग्णांशी थेट संपर्क येत असल्याने शिक्षक व त्यांच्या कुटुंबीयांनाही कोरोनापासून धोका निर्माण होत आहे. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांनाही विमा संरक्षण मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
-----------------
कोरोनाकाळात शिक्षकांनी विविध माध्यमातून शासनाच्या कार्यात आपले योगदान दिले असून, लाखो रुपयांचा कोविड निधीही जमा करून दिला आहे. दुसऱ्या लाटेत अनेक तरुण शिक्षकांना स्वतःचा जीव गमवावा लागल्याने त्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत म्हणून शासनाने इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांनाही विमा संरक्षण मिळावे.
- अंबादास वाजे, राज्य कार्याध्यक्ष
प्राथमिक शिक्षक संघ
-----------
कुटुंब सर्वेक्षणात घरोघर जाऊन रुग्णांची तपासणी करताना. (१८ पेठ १)
===Photopath===
180521\18nsk_7_18052021_13.jpg
===Caption===
१८ पेठ १