सिन्नर : तालुक्यात मान्सूनपुर्व पावसाने काही भागात हजेरी लावली होती. त्यात काही ठिकाणी वादळाचा तडाखा बसला. परंतू मृग नक्षत्र सुरू होवून बारा दिवस उलटून गेले, मात्र अद्यापही वरूणराजाची कृपादृष्टी झालेली नाही. गतवर्षी प्रमाणे यावर्षीही पावसाने सुरूवातीलाच दडी मारल्याने पेरणीच्या तयारीत असलेले शेतकरी चिंतेत असून मोठ्या पावसाची प्रतिक्षा करत आहे.मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतर तालुक्यातील काही भागात वादळी वाºयासह पावसाने हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणात त्याचा तडाखा बसला होता. त्यामुळे जोरदार पाऊस होईल अशी अपेक्षा होती. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामाचे वेध लागले होते. ८ जुन रोजी मृग नक्षत्रास प्रारंभ झाला असून पहिल्या दिवशी थोड्याफार प्रमाणात पावसाने सुरूवात केली होती. परंतू पाऊस गायब झाल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून जोरदार वाºयांमुळे शेतकरी वर्गात उलटसुलट चर्चा होती. जोराच्या हवेनी पाऊस लांबणीवर जाईल किंवा लवकर येईल असे दोन्ही भाकीते शेतकरी करीत होते. त्यामुळे नक्की काय पदरात पडणार याबाबत शेतकºयांत संभ्रम आहे. परिणामी वेळेवर पाऊस पडत नसल्याने पेरण्या खोळंबल्याने बळीराजाच्या चेहºयावर दिवसेंदिवस चिंतेचे ढग वाढतांना दिसत आहे.
बळीराजा दमदार पावासाच्या प्रतिक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 5:43 PM