देवगाव : वाकद येथील कालिका माता मंदिर परिसरात दोन दिवशीय यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.यात्रोत्सवानिमित्त श्री क्षेत्र तुळजापूर येथून ज्योत आणण्यात येणार आहे. तसेच रविवारी (दि.२८) सकाळी देवीच्या अलंकाराची व चासनळी ता. कोपरगाव येथून आणलेल्या कावडीची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात येणार आहे. अॅड. उत्तम वाळुंज व वंदना वाळुंज यांच्या हस्ते देवीची महापूजा केली जाणार आहे. मंगळवारी (दि.२९) कुस्त्यांची विराट दंगल आयोजीत करण्यात येणार आहे.नवरात्रोस्तवानिमित्तही येथे मोठी यात्रा भरते. महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमेला या ठिकाणी व्यवस्थापन समितीमार्फत महाप्रसादाचे आयोजन केले जाते. मंदिरामध्ये सकाळ, सायंकाळ देवीची आरती केली जाते.यात्रोत्सव यशस्वी करण्यासाठी मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अरुण बडवर, उपाध्यक्ष दिगंबर गायकवाड, रामेश्वर वाघचौरे, राहुल बडवर, रमेश पवार, गणेश गायकवाड, भाऊसाहेब बडवर, दत्तात्रय वाळुंज, बाळासाहेब गायकवाड, राजेंद्र बडवर, माणिक बडवर, प्रकाश कदम, विठ्ठल गाडेकर, विष्णुपंत बडवर, विश्वनाथ गायकवाड, दारकू बडवर, रामराव बडवर, बाजीराव बडवर, बंडेराव गायकवाड, सोमनाथ गोसावी, अंबादास खैरे, वसंत गायकवाड, बाळासाहेब शिंदे आदी प्रयत्नशील आहेत.चौकट...कालिका माता मंदिराबाबत आख्यायिका सांगितली जाते की, सन १९३२ मध्ये गोई नदीला महापूर आल्याने वाकद हे गाव महापुरात पूर्णपणे वाहून गेले मात्र कालिका मातेचे मंदिर व मूर्ती मात्र शाबूत राहिल्याचे सांगण्यात येते.सध्याचे वाकद हे पुनर्वसित गाव आहे, परंतु कालिका माता मंदिर हे आजही त्याच ठिकाणी म्हणजे गोईतीरी मोठ्या दिमाखात उभे आहे. मंदिर कळसाचा गोलघुमट व एकूणच बांधकाम मोगल शैलीतील आहे, त्यामुळे हे मंदिर अत्यंत पुरातन व मुगलकालीन असावे असे वाटते. ग्रामस्थांच्या वतीने नुकताच मंदिराचा जिर्णोद्दार, नवीन मूर्ती प्राणप्रतिष्ठा केली आहे. मंदिर परिसरात भव्य मंगल कार्यालय बांधण्यात आले आहे.
वाकदला कालिका माता यात्रोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 9:44 PM
देवगाव : वाकद येथील कालिका माता मंदिर परिसरात दोन दिवशीय यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे ग्रामस्थांच्या वतीने नुकताच मंदिराचा जिर्णोद्दार