शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

वाकी खापरी ‘ओव्हरफ्लो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 11:05 PM

घोटी : इगतपुरी तालुक्यातील वाकी नदीवरील वाकी खापरी धरणाचे काम पूर्ण झाले आहे.

घोटी : इगतपुरी तालुक्यातील वाकी नदीवरील वाकी खापरी धरणाचे काम पूर्ण झाले आहे. गेल्या अठरा वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांचा विरोध, भूसंपादन, पुनर्वसन आदी कारणांसह निधीच्या तुटवड्यामुळे रखडलेले हे धरण यावर्षी पूर्ण झाल्याने जलसंपदा विभागासह शेतकºयांनी आनंद व्यक्त केला.दरम्यान या वर्षी धरणात पाणी साठा करण्यात आल्याने या भागातील शेतीच्या सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा संपुष्टात येणार आहे. यामुळे या भागातील शेतकºयांनी समाधान व्यक्त करीत धरणाच्या अधिकाºयांचे कौतुक केले आहे. या धरणावर या वर्षी प्रथमच पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होत असल्याने नांदूरमधमेश्वर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता संजीव जाधव, वाकी खापरी धरणाचे सहाय्यक अभियंता हरिभाऊ गिते, शाखा अभियंता गोकुळ पिळोदेकर, स्वप्निल पाटील, लक्ष्मण खताळे, कचरूराव, विठ्ठल खाडे, सुनील गायकवाड आदींसह जलसंपदा विभागाचे कर्मचारी लक्ष ठेवून आहेत. वाकी खापरी धरण घोटी-वैतरणा- त्र्यंबकेश्वर मार्गावर असल्याने पर्यटकांची गर्दी वाढली आहे.————————-वाकी खापरी धरणाचे काम पूर्णत्वाकडे असतांना ह्या भागात काम करून धरण भागात मोठ्या प्रमाणावर ऋणानुबंध निर्माण झाले आहेत. शेतीव्यवसायासह या भागाला नवसंजीवनी देणारे हे धरण लोकांच्या कौतुकाला पात्र ठरले. प्रकल्पग्रस्त नागरिकांसाठी जे जे करता येणे शक्य होते ते सर्व करण्याचा प्रामाणकि प्रयत्न केला.- हरिभाऊ गीते, सहाय्यक अभियंता श्रेणी ? वाकी खापरी धरण——————-गेली अनेक वर्षापासून केवळ पारंपरिक भात पिकावर अवलंबून राहिलेल्या या भागातील शेतकर्यांना हे धरण संजीवनी देणारे ठरणार आहे.हंगामी पिकावर भिस्त न ठेवता धरणातील पाण्याच्या भरवश्यावर आधुनिक पिके,नगदी पिके घेण्यावर आमचा कल वाढला असल्याने अनेक शेतकर्यांचा आर्थिक स्तर उंचावला आहे.हे धरण आमच्या भागातील शेतकर्यांना पिण्याच्या पाण्यासाठी आण िसिंचनासाठी वरदान ठरले आहे.- संजय शिंदे,शेतकरी———————-दृष्टीक्षेपात वाकी खापरी धरणधरणाचा प्रकार - माती धरणआजचा पाणीसाठा - १६५५ द.ल.घ.फू.धरण क्षेत्रातील पाऊस - १९१० मी. मी.एकूण क्षमता - २६८० द.ल.घ.फू.संपादीत जमीन - १०२७ हेक्टरधरणाची उंची - ३३ मीटरधरणाची लांबी - १०५० मीटरधरण सांडवा लांबी - ४१ मीटरदरवाजे संख्या - तीन वक्र ाकार दरवाजे——————(0१ घोटी १/२)