वैतरणा येथे कुर्णोली ,वैतरणा,आहूर्ली केंद्रातील सर्व शाळेतील शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या स्वयंपाकी व मदतनीस यांच्यासाठी इगतपुरी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने पाककृती स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत वैतरणा,आहुर्ली आणि कुर्णोली केंद्रातील महिला मोठ्या संख्येने प्रतिसाद नोंदवला. प्रत्येकाने बनविलेली शाकाहारी व मांसाहारी दोन्ही विभागातील रेसिपी वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या. परिक्षक म्हणून वैतरणा विद्यालयातील रवींद्र मनोरे, विद्या पावणे, सविता पवार, एन.डी.भारंबे यांनी काम पाहिले. यावेळी पाककलाकृती मधून तीन स्पर्धक निवडण्यात आले. त्यात प्रथम क्र मांक गजाबाई राजेंद्र वाणी (वाकी शाळा ) रू.५०१ व साडी, द्वितीय नूरजहाँ अन्वर शेख (वैतरणा शाळा) रू. ३०१ व साडी तर तृतीय भारती विठ्ठल पादीर (देवळाची वाडी शाळा)यांना रू.२०१व साडी देऊन वाळविहीरचे सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे, केंद्रप्रमुख राजेंद्र नांदूरकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी रामकृष्ण पाटील, रेखा देवरे, चिंतामण गांगूर्डे, नीता वसावे, श्रावण लोते, वसंत पोटकुले, रोंगटे, दिपक भदाणे व शिक्षकवृंद उपस्थित होते. गजाबाई वाणी यांचे गटशिक्षणाधिकारी प्रतिभा बरडे,शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी अहिरे, मुख्याध्यापक रविंद्र पाटील,सिद्धार्थ निकुंभ, भरत चव्हाण ,पांडूरंग नाईक, तुळसा जाखेरे , संतोष कुंभार आदींनी कौतुक केले. प्रास्तविक विद्या पाटील यांनी केले. सूत्रसंचलन नांदूरकर यांनी तर आभार मोनाली देशमुख यांनी मानले.
बीटस्तरीय पाककृती स्पर्धेत वाकीच्या गजाबाई वाणी प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2020 3:11 PM