लोकमत न्यूज नेटवर्कपेठ : संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पेठ तालुक्यातील बोरवठ ग्रामपंचायतीच्या वतीने जलाभियान मोहीम राबवण्यात येत असून गावातील महिला बचत गटांनी एकत्र येत २ वनराई बंधारे बांधून ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ अभियानास हातभार लावला.ग्रामपंचायत बोरवट ता. पेठ, जि. नाशिक यांच्या वतीने गावातील १२ बचत गटाच्या महिला ग्रामसंघाच्या वतीने बोरवट शिवारातील नदीवर २ वनराई माती बांध श्रमदानातुन करण्यात आले. सरपंच सोनाली कामडी यांचे हस्ते जलपूजन करण्यात आले.याप्रसंगी पदमाकर कामडी, प्रभावती कामडी, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब मगर, पोलीस पाटील विद्याधर राऊत तसेच बचत गटाच्या महिला आदी उपस्थित होते.उपक्र मशील ग्रामपंचायत म्हणून ओळखबोरवठ ग्रामपंचायतने महिलांना कपडे धुण्यासाठी व जनावरांना पाणी पिण्यासाठी श्रमदानातुन वनराई माती बांध करण्यात आले आहेत. गावातील प्रत्येक कुटुंबाला घरापर्यत ग्रामपंचायत मार्फत नळ कनेक्शन व वॉटर मिटर बसविण्यात आले आहे. १ पैसा लिटर प्रमाणे पाणी देण्यात आले आहे. पाणीपट्टी महिन्याला वसुल केली जाते. पाणी पट्टी १०० टक्के वसुल होते. ग्रामपंचायत मार्फत आरओचे शुुध्द पाणी पुरवठा २० लिटर पाण्याचा थंडजार ५ रु पयांमध्ये २४ तास थंड पाण्याची व्यवस्था केलेली आहे. गावामध्ये पशु, पक्षी यांना पाणी पिण्यासाठी गावाच्या चारी दिशेला चार पाण्याचे मोठे हाळ बांधण्यात आले आहेत. त्या मध्ये २४ तास पाणी उपलब्ध असते. गावातील प्राथमिक शाळा व अंगणवाडी यांना साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. ग्रामपंचायतीस सन 2019 मध्ये ग्रामपंचायतला नाशिक जिल्हाचा जलव्यवस्थापन १ नंबरचा लोकमत पुरस्कार मिळालेला आहे. सन २०१९ मध्ये पेठ तालुका स्मार्ट ग्रामपंचायतीचा व संत गाडगे महाराज ग्राम पुरस्कार नाशिक जिल्हामध्ये ३ नंबर आलेला आहे.
महिला बचत गटांनी बांधला वनराई बंधारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 4:55 PM
लोकमत न्यूज नेटवर्क पेठ : संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पेठ तालुक्यातील बोरवठ ग्रामपंचायतीच्या वतीने जलाभियान मोहीम राबवण्यात येत असून ...
ठळक मुद्दे‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ बोरवठ ग्रामपंचायतीचे जलाभियान