वणी : केंद्र शासनाच्या वाणिज्य विभागाने निर्यातमूल्य हटविल्याने कांदा निर्यातीचा मार्ग सुकर झाला असून, कांद्याच्या भावाबाबत स्थैर्याचे व सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. मागे देशांतर्गत प्रमुख कांदा उत्पादक राज्यांमध्ये अनैसर्गिक वातावरण निर्माण होऊन, त्या भागातील कांदा उत्पादनाला याचा मोठा फटका बसला होता. उत्पादनात घट आल्याने महाराष्ट्रातील कांद्याला देशांतर्गत मागणी वाढली होती. विशेषत: नाशिक जिल्ह्यातील कांदा अग्रेसर होता. मागणी असल्याने व्यापारी चढ्या भावाने उत्पादकांकडून कांदा खरेदी करून परराज्यांसह परदेशातही पाठवत. याचा परिणाम भाववाढीवर झाला व किरकोळ बाजारपेठांमध्ये कांद्याचे भाव गगनाला भिडल्याने भाव नियंत्रणात आणण्यासाठी वाणिज्य मंत्रालयाने कांद्यावर निर्यातमूल्य लागू केले. त्यामुळे कांदा खरेदी करून तसेच निर्यातमूल्य अदा करून कांदा निर्यात करणे व्यापाºयांना परवडेनासे झाले तसेच भारतीय कांद्याच्या तुलनेत इतर देशांचा कांदा तुलनात्मकरीत्या स्वस्त मिळू लागला. त्यामुळे व्यापारी वर्गानेही सावध पवित्रा घेत कांदा खरेदीबाबत हात आखडता घेतला. देशाचे अंदाजपत्रक सादर झाल्यानंतर निर्यातमूल्य हटविले गेल्याचा आदेश निघाला. यामुळे उत्पादक व व्यापाºयांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, परकीय चलन व मजबूत अर्थव्यवस्थेसाठी हे हिताचे पाऊल असल्याची प्रतिक्रि या दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तात्रय पाटील, उपसभापती अनिल देशमुख, संचालक नंदलाल चोपडा यांनी दिली. मध्य प्रदेश व गुजरात राज्यातील कांदाही स्पर्धात्मक पर्याय म्हणून दाखल झाला. याचा एकत्रित परिणाम कांद्याच्या भाव घसरणीवर झाला. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी व्यापारी व उत्पादकांकडून निर्यातमूल्य हटविण्याचा रेटा सुरू झाला. सातत्याची मागणी व पाठपुराव्याला यश आले.
वणी : निर्यातमूल्य उठविल्याचा परिणाम कांदा उत्पादकांचा उत्साह दुणावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 12:25 AM
वणी : केंद्र शासनाच्या वाणिज्य विभागाने निर्यातमूल्य हटविल्याने कांदा निर्यातीचा मार्ग सुकर झाला असून, कांद्याच्या भावाबाबत स्थैर्याचे व सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
ठळक मुद्देमंत्रालयाने कांद्यावर निर्यातमूल्य लागू केलेनिर्यातमूल्य हटविले गेल्याचा आदेश