वणी : लाल कांद्याची बाजारात कमी आवक तर उन्हाळ कांद्याचा बाजारात प्रवेश अशा स्थितीत लाल कांद्याच्या तुलनेत उन्हाळ कांद्याला प्रारंभीच अधिक दर मिळू लागल्याने उत्तरार्धात कांदा खरेदीत गती येण्याचा अंदाज वर्तविण्यात येतो आहे.वणी उपबाजारात ४३० वाहनांमधून ९ हजार ५००क्विंटल कांद्याची आवक झाली. लाल कांद्याला ७७७ रु पये कमाल तर किमान ३०० तर सरासरी ५२५ रु पये प्रति क्विंटल दर मिळाला. उन्हाळ कांद्याला ९५१ रु पये कमाल तर किमान ५०० आणि सरासरी ७२५ रु पये प्रति क्विंटल दर मिळाला.लाल कांदा जवळपास अल्प शेतकऱ्यांकडे आहे. हा कांदा टिकाऊ व साठवण क्षमता नसल्याने उत्पादकांनी विक्र ीसाठी अग्रक्र म दिला आहे. दरम्यान, उन्हाळ कांद्याचे आगमन झाले असून टिकवणक्षमता, साठवणुकीसाठी योग्य व दर्जात्मक असल्याने उत्पादकांबरोबर व्यापारीही साठवणूक करीत आहेत. सध्या या कांद्याला दिल्ली व पंजाब येथे विशेष मागणी वाढली आहे तसेच अखाती देशांबरोबर मलेशिया, सिंगापूर , श्रीलंका या देशांतही मागणी वाढल्याने व्यापारीवर्गात उत्साह संचारला आहे .
वणीत उन्हाळ कांद्याला ९५१ रुपये भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 12:34 AM
लाल कांद्याची बाजारात कमी आवक तर उन्हाळ कांद्याचा बाजारात प्रवेश अशा स्थितीत लाल कांद्याच्या तुलनेत उन्हाळ कांद्याला प्रारंभीच अधिक दर मिळू लागल्याने उत्तरार्धात कांदा खरेदीत गती येण्याचा अंदाज वर्तविण्यात येतो आहे.
ठळक मुद्देआवक वाढली : देश-परदेशातही मागणी