शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
5
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
6
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
7
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
8
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
9
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
10
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
11
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
12
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
13
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
14
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
15
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
17
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
18
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
19
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
20
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी

जीवनात विशाल दृष्टिकोन हवा :  बाभूळगावकर शास्त्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2019 12:13 AM

सध्याच्या काळात माणसाची वृत्ती संकुचित होत चालली आहे. त्यामुळे ताणतणावतून आत्महत्येसारखे प्रकार घडत आहेत. जीवनात आनंद निर्माण होण्यासाठी विशाल दृष्टिकोन अंगीकारण्याची गरज आहे, असे विचार आचार्यप्रवर महंत बाभूळगावकर बाबा शास्त्री यांनी व्यक्त केले.

नाशिक : सध्याच्या काळात माणसाची वृत्ती संकुचित होत चालली आहे. त्यामुळे ताणतणावतून आत्महत्येसारखे प्रकार घडत आहेत. जीवनात आनंद निर्माण होण्यासाठी विशाल दृष्टिकोन अंगीकारण्याची गरज आहे, असे विचार आचार्यप्रवर महंत बाभूळगावकर बाबा शास्त्री यांनी व्यक्त केले.नाशिक जिल्हा महानुभाव समितीच्या वतीने माडसांगवी (ता. नाशिक) येथे शनिवारी (दि. ३१) आयोजित भगवान श्रीचक्रधर स्वामी जयंती उत्सवातील धर्मसभेत शास्त्रीजी बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर आचार्यप्रवर महंत नागराज शास्त्री, आचार्य प्रवर महंत सुकेणेकर बाबा शास्त्री, महंत सुभद्राबाई शास्त्री कपाटे, महंत संतोषमुनी कपाटे, महंत भीष्माचार्य बाबा, महंत चक्रपाणी बाबा कोठी आदी उपस्थित होते. याप्रसंगी महंत बाभूळगावकर शास्त्री यांनी सांगितले की, श्री चक्रधर स्वामी यांनी बाराव्या शतकात सर्व समाजांतील लोकांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. आनंद प्राप्तीसाठी मोहमाया यांचा त्याग करण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी महंत सुकेणेकर शास्त्री यांनी विचार मांडले.दरम्यान, श्री चक्रधर स्वामी जयंती महोत्सवानिमित्त सकाळी देवास मंगल स्नान, भगवत गीता पाठ, आदी कार्यक्रम संपन्न झाले. त्यानंतर संत- महंताच्या हस्ते ध्वजारोहण व सभा मंडपाचे उद्घाटन झाले. प्रास्ताविक वामनराव आवारे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. बाळकृष्ण अंजनगावकर यांनी केले. अर्जुनराज सुकेणेकर यांनी आभार मानले. दरम्यान, सर्व महंतांचा आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गोपीराज शास्त्री सुकेणेकर, राजधरदादा सुकेणेकर, दामोदर अण्णा महानुभाव, महंत गोविंदराज अकुंळनेरकर, महंत अंजनगावकर बाबा, पोपटराव गायकवाड, प्रभाकर कातकाडे आदी उपस्थित होते.विशेष कार्य सेवा पुरस्कार सोहळाजिल्हा महानुभाव समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले. तसेच नागदेवाचार्य विशेष कार्य सेवा गौरव पुरस्कार देऊन अर्जुनराव सुकेणेकर, दौलतराव मोरे, सुखदेव केदारे यांचा गौरव करण्यात आला, तर वामनमुनी अंकुळनेरकर यांचा विशेष पुरस्काराने गौरव करण्यात आला.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक