नाशिक : पाणीपुरवठा योजना मंजूर असताना पाण्याचा थेंबही गावात पोहचत नसल्याने गेल्या चार वर्षांपासून जिल्हा परिषदेचा उंबरठा झिजविणाºया महिलांना सातत्याने तारीख पे तारीख मिळत आहे पण त्यांच्या गावाला पाणी मात्र मिळत नाही. जिल्हा परिषदेत आल्यावर या महिलांना पिण्यासाठी पाणीही विचारले जात नाही तेव्हा गावात पाणी पोहचण्यासाठीचे प्रामाणिक प्रयत्न होतील तरी का अशा प्रश्नांकित चेहºयाने या महिला कार्यालयाबाहेर पडल्या. इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो या सुमारे पाच हजार लोकवस्तीच्या गावाला गेल्या चार वर्षांपासून पाण्याची प्रतीक्षा आहे. पूर्वीच्या पाणीपुरवठा समितीने काय केले आणि त्यामुळे पाण्याचा प्रश्न कसा निर्माण झाला या तांत्रिक बाबी असल्या तरी गावाला आज पाणी मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. गावातील विहिरी आताच आटल्या आहेत. पुढे उन्हाळ्याचे दिवस येतील तेव्हा पाण्याची भीषणता अधिक प्रकर्षाने समोर येईल, तेव्हा करायचे काय? दर उन्हाळ्यात हाच विचार करून गावातील वत्सलाबाई भागडे, अंजनाबाई भागडे, विद्या चव्हाण, लक्ष्मीबाई जगताप, मंजुळाबाई भागडे, कमलबाई जगताप, नंदाबाई भागडे, पुष्पा अडोळ, सावित्रीबाई कडू, मथुराबाई अडावळ, संगीता भागडे या बारा महिला पाण्याचे मागणे घेऊन जिल्हा परिषदेचा उंबरठा झिजवत आहे. परंतु प्रत्येकवेळी त्यांना पुढची तारीख किंवा आश्वासन देऊन परत पाठविले जात आहे. ग्रामीण, आदिवासी भागातील या महिला गेल्या चार वर्षांपासून पाण्यासाठी झगडत आहेत. गावात सद्यस्थितीत पाण्याचा थेंबही नाही किंबहुना पाण्याची यंत्रणाच अस्तित्वात नसल्याने गावातील लोकांना पाण्याचा टॅँकर मागवावा लागतो. पाण्यासाठी चारशे-पाचशे रुपये मोजावे लागतात. ज्याला ते शक्य होते तो टॅँकर मागवून आपली गरज भागवून घेतो. परंतु सर्वांनाच ते शक्य होत नाही. पाण्यासाठीची वणवण म्हणूनही थांबत नाही. गावाचा हाच पाणीप्रश्न घेऊन गावातील बारा महिल्या एकत्र आल्या आहेत. त्यांनी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला वारंवार विनवणी केली, याचना केली मात्र त्यांना जुजबी उत्तरे देऊन समजूत काढली जाते. यातील सर्वच महिल्या या साठीच्या पुढील आहेत. त्यामुळे त्या प्रशासनाशी झगडा करून आपल्या मागण्या मांडू शकत नाहीत तरीही त्यांनी हार मानलेली नाही. गावाच्या पाण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून त्या केवळ आश्वासन घेऊन परतात आणि अपेक्षाभंग झाला की पुन्हा जिल्हा परिषदेत येतात. प्रशासनाचे अधिकारी त्यांना दाद लागू देईनात किंबहुना त्यांना दुर्लक्षित केले जात आहे. ही बाब त्यांनाही ज्ञात आहे परंतु कितीही अवमान झाला तरीही पाण्यासाठी जिल्हा परिषदेत येतच राहायचे हा त्यांचा निर्धार त्यांना नाउमेद होऊ देत नाही. प्रशासनाकडून अपेक्षा करणे तसेही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे असते, परंतु ज्यांच्या भरवशावर या महिला जिल्हा परिषदेत येतात ते सदस्यही केवळ फोनवर आश्वासन देऊन त्यांना ताटकळत ठेवतात. मंगळवारी (दि.१६) आलेला अनुभव या महिलांसाठी वेगळा नव्हताच. या वयोवृद्ध महिलांना प्रशासनाकडून दाद मिळाली नाही आणि लोकप्रतिनिधींकडूनही. पाणीपुरवठा विभागाकडून टेंडरप्रक्रिया सुरू असल्याचे कारण पुढे केले जात आहे. परंतु ही प्रक्रिया पूर्णत्वास कधी येणार हे मात्र सांगितले जात नाही. त्यासाठी तारीख पे तारीख दिली जात आहे. मागील ठेकेदाराने काम सोडून दिले. नवा ठेकेदार ते काम करील याचीही शाश्वती नाही. मग विश्वास ठेवावा कुणावर हा प्रश्न या महिलांच्या चेहºयावर तरळतो. लोकप्रतिनिधींच्या भरवशावर जिल्हा परिषदेत आलेल्या या थकल्या, भागल्या महिलांना मात्र त्यांची चातकाप्रमाणे वाट पाहून परतावे लागते. चार वर्षांत असे कितीतरी अनुभव या महिलांनी पचविले आहेत.माणुसकीची माफक अपेक्षापाण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेत येणाºया या सर्व महिलांचे वय ५५ ते ६०च्या पुढे आहे. दूरवरून येथे आल्यानंतर त्यांना सन्मानाने बसण्यासाठी जागा आणि आपुलकीने पाणी विचारणाºया दोन शब्दांची अपेक्षा असते. प्रशासनाचे सरकारी उत्तर ऐकून परतलेल्या या महिलांना दिलासा देणारे शब्दही आधार देणारे ठरू शकतील. यापैकी कोणताही सुखद अनुभव या महिलांना नसला तरी पाणीपुरवठा विभाग, लोकप्रतिनिधी आणि सीईओ यांनी एकदा या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले तर आमचा प्रश्न नक्कीच सुटू शकेल, इतकी विदारकता या प्रश्नात आहे. त्यामुळे प्रश्न सुटू शकतो. गरज आहे ती या प्रश्नाकडे आणि प्रामाणिक प्रयत्नांकडे माणुसकीने पाहण्याची. जाता जाता या महिला असा साधा उपाय सांगून जातात.
चार वर्षांपासून पाण्यासाठी याचना : नांदगाव सदोमधील महिलांचा एकाकी संघर्ष उंबरे झिजवूनही जिल्हा परिषदेला फुटेना पाझर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:24 AM
नाशिक : पाणीपुरवठा योजना मंजूर असताना पाण्याचा थेंबही गावात पोहचत नसल्याने गेल्या चार वर्षांपासून जिल्हा परिषदेचा उंबरठा झिजविणाºया महिलांना सातत्याने तारीख पे तारीख मिळत आहे
ठळक मुद्देचार वर्षांपासून पाण्याची प्रतीक्षागावातील विहिरी आताच आटल्या