मालेगाव : शहरात गेल्या ५ एप्रिल रोजी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली होती. प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली होती. या या पार्श्वभूमीवर ९ एप्रिल रोजी येथील शासकीय विश्रामगृहावर कृषिमंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या उपस्थितीत तातडीची बैठक झाली होती.या बैठकीत तालुक्यात चारशे पथके तयार करून सर्वेक्षण करण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले होते. तसेच प्रतिबंधात्मक आदेश न पाळणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश कृषिमंत्री भुसे यांनी याच बैठकीत दिले होते. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अत्यावश्यक सेवा पुरविल्या जातील असे आवाहनही त्यांनी केले होते.१३ एप्रिल रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर संयुक्त बैठक घेत कोरोना आराजाबाबत उपाययोजनांचा आढावा घेतला होता. यानंतर वारंवार जिल्हाधिकारी सूरज मांढरे, नाशिक परिक्षेत्राचे महानिदेशक छोरिंग दोर्जे, जिल्हा पोलीस प्रमुख आरती सिंह, मनपा आयुक्त किशोर बोर्डे, अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, तहसीलदार चंद्रजित राजपूत, शिवकुमार आवळकंठे, पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, रत्नाकर नवले, गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या. यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनां बाबत चर्चा करण्यात आली.-------------साथरोग प्रतिबंधात्मक अन्वये कारवाईमालेगाव शहरात रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांनी ११ एप्रिलपासून शहर पूर्णपणे लॉकडाउन करण्यासाठी संचारबंदी लागू केली आहे. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाºयांविरुद्ध कारवाई केली जात आहे. ११ ते १४ एप्रिल दरम्यान पूर्ण लॉकडाउन करण्यात आले होते. त्यानंतर येत्या ३ मे पर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्यात आले आहे. मास्कचा वापर न करणाºयांवर गेल्या ११ एप्रिलपासून साथरोग प्रतिबंधात्मक अन्वये कारवाई करण्यात येत आहे. १२ एप्रिल रोजी मालेगावी इमर्जन्सी आॅपरेशन सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरवर नियंत्रण व सूक्ष्म पर्यवेक्षणासाठी डॉ. पंकज आशिया यांना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी प्राधिकृत केले. त्यांच्यावर कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांनी पदभार घेतल्यानंतर शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला.
मालेगावी यंत्रणेकडून युद्धपातळीवर उपाययोजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 10:48 PM