शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
3
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
4
"अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
5
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
6
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
7
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
8
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
9
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
10
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
11
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
12
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
13
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
14
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
15
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
16
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
17
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
18
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
19
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
20
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं

एका प्रस्तावासाठी प्रभाग समितीची  सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 12:49 AM

महापालिका प्रभाग समित्यांची दरमहा एक सभा होत असते. मात्र, या प्रभाग समित्यांवरही प्रस्तावांची वानवा दिसून येत असल्याचे चित्र आहे. सोमवारी (दि.२९) झालेल्या पूर्व प्रभाग समितीच्या सभेत अवघ्या एका विषयासाठी प्रभाग समितीची सभा बोलाविण्यात आली आणि अन्य विषयांवरच सदस्यांनी आपली ४० मिनिटे खर्च केली. दरम्यान, सभेत अतिक्रमण आणि स्वच्छताविषयक प्रश्नी सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली.

इंदिरानगर : महापालिका प्रभाग समित्यांची दरमहा एक सभा होत असते. मात्र, या प्रभाग समित्यांवरही प्रस्तावांची वानवा दिसून येत असल्याचे चित्र आहे. सोमवारी (दि.२९) झालेल्या पूर्व प्रभाग समितीच्या सभेत अवघ्या एका विषयासाठी प्रभाग समितीची सभा बोलाविण्यात आली आणि अन्य विषयांवरच सदस्यांनी आपली ४० मिनिटे खर्च केली. दरम्यान, सभेत अतिक्रमण आणि स्वच्छताविषयक प्रश्नी सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली.  महिन्यातून एकदा प्रभाग समित्यांची सभा होत असते आणि पाच लाखांच्या आतील विकासकामांचे प्रस्ताव मंजूर करण्याचे अधिकार प्रभाग समित्यांना आहेत. महिनाभरातील प्रस्ताव सभेत ठेवणे अपेक्षित आहे. परंतु, सोमवारी झालेल्या पूर्व प्रभाग समितीच्या सभेत अवघा एकच प्रस्ताव विषयपत्रिकेवर होता. त्यामुळे, सदस्यांनी आश्चर्य व्यक्त केले. प्रभाग ३० मध्ये पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर सदस्यांनी अतिक्रमण आणि स्वच्छताविषयक प्रश्नी प्रशासनाला धारेवर धरले. सतीश सोनवणे यांनी प्रभाग ३० मधील राजीवनगर झोपडपट्टीलगतच्या शंभर फुटी रस्त्याच्या दोन्ही बाजूचे पदपथ अतिक्रमणात हरविले असल्याची तक्रार केली, तसेच उद्यानांची देखभाल करणाºया संस्थांकडून देखभाल होत नसल्याचेही निदर्शनास आणून दिले. स्वच्छ सर्वेक्षणाच्या निमित्ताने झालेली स्वच्छता कायमस्वरूपी ठेवण्याची अपेक्षा अ‍ॅड. श्याम बडोदे यांनी व्यक्त केली. श्रद्धा विहार रो-हाउसच्या कार्नरला असलेली पडीत धोकादायक विहीर कचराकुंडी बनल्याचे सांगत सहा मीटर रस्त्यावर अनधिकृत सर्व्हिस स्टेशन सुरू असल्याची तक्रार केली. श्यामला दीक्षित यांनी सांगितले, सुचितानगरमध्ये स्वच्छता कर्मचारी फिरकतच नाहीत. जॉगिंग ट्रॅक येथील एक धार्मिक स्थळ हटविण्यात आले परंतु, त्याची जागा गॅरेजधारकांनी घेतल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. स्वच्छता कर्मचाºयांच्या अरेरावीबद्दलही सुषमा पगारे व दीक्षित यांनी संताप व्यक्त केला. प्रभागात अनधिकृतपणे शेड उभारत व्यवसाय केले जात असल्याचे अजिंक्य साने यांनी सांगितले. प्रभाग २३ मधील उद्यानाची देखभालीअभावी दयनीय स्थिती असल्याची तक्रार प्रशांत जाधव यांनी केली.स्वीकृत सदस्यांचा सहभाग प्रभाग समित्यांच्या सभांना फारसे प्रस्ताव नसतात आणि बºयाचदा प्रमुख अधिकारीही उपस्थित नसतात. त्यामुळे, प्रभागच्या सभांना सदस्यही गांभीर्याने घेत नाहीत. बºयाच प्रभाग सभांना सदस्यांची गैरहजेरी असते. सोमवारी झालेल्या पूर्व प्रभाग समितीच्या सभेला मागील महिन्यात स्वीकृत म्हणून नियुक्त झालेले अजिंक्य साने, प्रशांत जाधव आणि श्यामला दीक्षित यांनी हजेरी लावली आणि चर्चेत सहभागही घेतला.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका