शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
2
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
3
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
4
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
5
अजितदादांना धक्का बसणार, रामराजे नाईक निंबाळकर तुतारी फुंकणार?
6
अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच
7
"गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला अन्..."; मुलींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
8
"आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले
9
"आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार’’, राहुल गांधींची घोषणा  
10
पहिल्या T20 आधी बांगलादेशच्या संघात घबराट? मशिदीत न जाता 'या' ठिकाणी केलं नमाज पठण
11
भाजपाची जम्मू काश्मिरात मोठी खेळी! 'या' पाच आमदारांमुळे सत्तेचं समीकरण बदलणार?
12
अजिंक्य रहाणेला तोड नाय! मुंबईच्या विजयाची 'गॅरंटी' देणारा दिग्गज कर्णधार, पाहा आकडेवारी
13
Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला
14
IndiGo Airlines: इंडिगोची यंत्रणा ठप्प; देशभरात अडकले प्रवासी, एअरलाइन्सने मागितली माफी!
15
"आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करा", डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलला सल्ला
16
बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक हरपला; माजी आमदार सीताराम दळवींचं मुंबईत निधन
17
"रोहित शर्मा अन् टीम इंडियाला माझा सलाम..."; ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने केला कौतुकाचा वर्षाव
18
हरियाणात काँग्रेस किती जागा जिंकणार? अशोक तंवर यांचं मोठं भाकीत
19
₹९९ च्या इश्यू प्राईजच्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद, ३१ वर्ष जुनी आहे कंपनी; जाणून घ्या
20
Narendra Modi : "काँग्रेसपासून सावध राहा, कारण..."; महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन

प्रभाग मोठा; सुविधांची वानवा

By admin | Published: November 16, 2016 10:15 PM

काठेगल्ली, मुंबई नाका परिसर : पथदीप, स्वच्छतेचा प्रश्न कायम

अझहर शेख नाशिकगेल्या २५ वर्षांपासून भाभानगर, मुंबई नाका, काठेगल्ली हा परिसर राजकीयदृष्ट्या भाजपा, शिवसेना या पक्षांच्या बाजूने कौल देत आला आहे. सुरुवातीला भाजपानंतर शिवसेनेने या परिसरात आपले अस्तित्व निर्माण केले. गेल्या पंचवार्षिकमध्ये राज ठाकरे यांच्या लाटेमुळे या भागातून मनसेलाही जनतेने कौल दिल्याने दोन्ही जागांवर मनसेचे उमेदवार निवडून आले. शहराचा मध्यवर्ती विकसनशील परिसर म्हणून या भागाची ओळख आहे. या परिसराला पुणे-मुंबई दोन्ही महामार्ग जवळ आहे. नव्याने झालेल्या प्रभागरचनेमुळे मनसेच्या प्रभावक्षेत्रात सेना-भाजपाचे आव्हान असणार आहे. नवीन प्रभागरचनेमुळे भाभानगरचा सध्याचा प्रभाग ३९ व काठेगल्ली, बनकर चौक, शंकरनगर, टाकळीफाटा या परिसराचा प्रभाग ३० मिळून प्रभाग क्रमांक १५ ची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे प्रभागाची व्याप्ती प्रचंड वाढली असून, तिगरानिया रोडपासून थेट मुंबई नाका आणि गायकवाड सभागृहापासून तुलसी आय रुग्णालयापर्यंत व्याप्ती पसरली आहे. चाळीस हजार लोकसंख्या असलेल्या या प्रभागात सर्वसाधारण, सर्वसाधारण महिला, ओबीसी महिला असे आरक्षण पडले आहे. यामुळे सर्वसाधारण व ओबीसीमधून महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतील. सर्वसाधारण व सर्वसाधारण महिला असे या प्रभागाचे आरक्षण असल्यामुळे दोन्ही जागांवर इच्छुक स्त्री-पुरुषांच्या उड्या पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मनसेकडून आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न होणार आहे, तर सेना-भाजपाकडून पुन्हा आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न होताना दिसून येईल. प्रभागात आजही मूलभूत सुविधांबाबत ओरड कायम आहे. रस्ते, पथदीप आदि समस्या ‘जैसे थे’ आहेत. सध्याच्या प्रभाग क्रमांक ३० हा विकासाच्या तुलनेत प्रभाग ३९ पेक्षा सरस आहे. सर्वांगीण विकासाच्या प्रतीक्षेत नागरिक आहेत.महापालिकेच्या १९९२-९७ च्या पंचवार्षिक निवडणुकीत वसंत गिते निवडून आले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष राज ठाकरे यांनी स्थापन केला. यावेळी गिते यांनीही शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आणि मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवून आमदार झाले. एकूणच भाभानगरसह टाकळीरोड, काठेगल्लीचा प्रभाग भाजपा, सेना, मनसेच्या बाजूने कौल देत आला आहे. काठे गल्ली भागातून १९९२-९७ मध्ये नगरसेवक दशरथ पटेल यांच्यासमोर प्रतिस्पर्धी म्हणून माजी आमदार गणपतराव काठे यांनी अपक्ष निवडणूक लढवित विजय मिळविला होता. २००२मध्ये पुन्हा याच परिसरातून काठे यांनी अपक्ष निवडणूक लढवित भाजपाचे ज्येष्ठ नेते बंडोपंत जोशी यांचा पराभव केला होता. २००७ मध्ये सेना-भाजपाची युती असताना सचिन मराठे सेनेच्या तिकिटावर पहिल्यांदा काठेगल्ली भागातून निवडून गेले. २०१२च्या पंचवार्षिकमध्येही सेनेकडून उमेदवारी करणारे मराठे यांना प्रतिनिधित्वाची पुन्हा संधी मिळाली. त्यांनी गजानन शेलार यांचा पराभव केला. मराठे यांच्यासमवेत मनसेच्या अर्चना थोरात प्रथमच निवडून आल्या.पखालरोड ते मुंबई नाका : नासर्डी नदीकाठच्या रस्त्याला संरक्षक कठड्यांची अथवा भिंत उभारण्याची गरज आहे.