नाशिक : दक्षिण गंगा गोदावरी प्रदूषणमुक्त करण्यासाठी गोदाप्रेमींनी प्रयत्न करून शासकीय यंत्रणा हलल्या असल्या तरी मुख्यत्वे करून नागरिकांना परावृत्त करण्यासाठी नाशिकच्या नमामि गोदा फाउंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आलेली वारी उपक्रमाचा दुसरा टप्पा अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे पोहचला असून, नातीचे नाते सांगणाऱ्या या उपक्रमात परिसरातील अनेक ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.देहू-आळंदीची वारी ही सर्वांना माहिती असते. गेल्या काही वर्षांत नाशिकमधून ‘सायकल वारी’देखील प्रसिद्ध झाली. परंतु त्यापलीकडे जाऊन गोदावरी नदीच्या प्रदूषणमुक्ती वारीचा उपक्रम गेल्यावर्षीपासून नमामि गोदा फाउंडेशनने सुरू केला आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत गोदावरी नदीचे उगमस्थान असलेल्या ब्रह्मगिरी येथून नाशिक शहरातील रामकुंडापर्यंत यात्रेचा पहिला टप्पा होता. प्रख्यात जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला होता. गोदाकाठी असलेल्या विविध गावात जाऊन गोदावरी नदीचे महत्त्व सांगतानाच नदीशी असलेले नाते अधिक घट्ट करण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यामाध्यमातून प्रदूषण टाळण्यासाठी स्थानिक नागरिकांचा सहभागदेखील मिळवण्यासाठी प्रयत्न केला जातो.यंदा वारीचा दुसरा टप्पा रामकुंडापासून कोपरगावपर्यंत होता आणि तेथे वारी पोहोचली असून स्थानिक नागरिकांनी त्याचे उत्साहात स्वागत केले. विशेष म्हणजे फाउंडेशनचे कार्यकर्ते अभिनेता चिन्मय उदगीरकर आणि अन्य कलावंतदेखील यात सहभागी झाले आहेत. वारीच्या माध्यमातून महाविद्यालयांचादेखील सहभाग घेण्यात आला आहे.
‘वारी गोदावरी’ पोहोचली कोपरगावपर्यंत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 1:28 AM
दक्षिण गंगा गोदावरी प्रदूषणमुक्त करण्यासाठी गोदाप्रेमींनी प्रयत्न करून शासकीय यंत्रणा हलल्या असल्या तरी मुख्यत्वे करून नागरिकांना परावृत्त करण्यासाठी नाशिकच्या नमामि गोदा फाउंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आलेली वारी उपक्रमाचा दुसरा टप्पा अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे पोहचला असून, नातीचे नाते सांगणाऱ्या या उपक्रमात परिसरातील अनेक ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.
ठळक मुद्देप्रबोधनाची परिक्रमा : पुढील वर्षी पैठण येथे होणार ‘पर्यावरण वारकरी’ दाखल