अंदरसुल : येवला तालुक्यातील देवठाण येथे संतकृपा वारकरी शिक्षण संस्था यांच्यावतीने बालसंस्कार शिबिरास प्रारंभ करण्यात आला आहे.महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत गंगागिरी महाराज सरालाबेट संस्थांचे ब्रम्हलिंन नारायनिगरी महाराज यांचे उत्तराधिकारी तथा मठाधिपती रामगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली देवठाण गावात बालसंस्कार व वारकरी संप्रदायाचे शिक्षण देऊन संस्कारक्षम अश्या बालकांना या शिबिरात मृदुंग, हार्मोनियम, हरिपाठ, कीर्तन, गीता पाठ, अभंग, प्रवचन, योगासने, वारकरी सांप्रदायिक पावल्या व संस्काराचे धडे देण्यात येतात.सुसंस्कृत पिढी घडविण्याचे कार्य या वारकरी शिबिरात होत आहे. शिबिरार्थीना मधुकर महाराज कडलग, चंद्रकांत महाराज सावंत, भागवताचार्य श्रावण महाराज जाधव, मृदुंगाचार्य रामेश्वर महाराज आरखडे आदी मार्गदर्शन करीत आहेत. शिबिरात देवठाण व पंचक्र ोशातील बालकांनी सहभाग घेतला आहे. या शिबिरास रामगिरी महाराज यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले.
वारकरी शिबिरास देवठाण येथे प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 7:35 PM
अंदरसुल : येवला तालुक्यातील देवठाण येथे संतकृपा वारकरी शिक्षण संस्था यांच्यावतीने बालसंस्कार शिबिरास प्रारंभ करण्यात आला आहे.
ठळक मुद्देसुसंस्कृत पिढी घडविण्याचे कार्य या वारकरी शिबिरात होत आहे.