नाशिक : शहरातील लहान-मोठे चौक आणि दुभाजकांच्या सुशोभिकरणासाठी महापालिकेला चांगला प्रतिसाद मिळाला असून, प्रायोजक म्हणून अनेक व्यापारी आणि उद्योगसंस्थांनी तयारी दर्शविली आहे. त्यामुळे आता नजीकच्या काळात अनेक ठिकाणी नवीन वाहतूक बेट तयार होतील, तर काही ठिकाणी जुन्या वाहतूक बेटांना झळाळी मिळणार आहे.रस्ते, पाणी, दिवाबत्ती यांसारखी मूलभूत कामे महापालिकेच्या वतीने केली जातात. मात्र शहर स्वच्छ ठेवण्यात तसेच सुशोभिकरणात सामान्य नागरिक तसेच उद्योजक-व्यापारी म्हणजेच स्टेक होल्डर्सचा प्रतिसाद अपेक्षित असतो. महापालिकेने यापूर्वी अशाप्रकारे खासगीकरणातून अनेक बेटे विकसित केले असले तरी काळानुरूप अनेक चौक नव्याने तयार झाले असून, काही ठिकाणी महापालिकेने रुंद रस्ते केल्याने दुभाजकही तयार करण्यात आले आहेत.त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने सुमारे दीडशे वाहतूक बेटांसाठी इच्छुकांकडून देकार मागवले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून, अनेक ठिकाणी नवीन वाहतूक बेट, जंक्शन तयार करणे, दुभाजक सुशोभित करणे यासाठी व्यावसायिक संस्था तयार झाल्या आहेत.वाहतूक बेटांची दुरवस्थासर्वात महत्त्वाचे म्हणजे शहरातील अनेक जुन्या वाहतूक बेटांची दुरवस्था झाली असून, तेथे सुशोभिकरणासाठीदेखील अनेक संस्था तयार झाल्याने नजीकच्या काळात सुमारे दीडशे वाहतूक बेटांना झळाळी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दीडशे वाहतूक बेटांना मिळणार झळाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 12:53 AM
शहरातील लहान-मोठे चौक आणि दुभाजकांच्या सुशोभिकरणासाठी महापालिकेला चांगला प्रतिसाद मिळाला असून, प्रायोजक म्हणून अनेक व्यापारी आणि उद्योगसंस्थांनी तयारी दर्शविली आहे.
ठळक मुद्देप्रायोजकांचा शोध : उद्योजकांनी दिला प्रतिसाद