देवळाली कँम्प : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून उमेदवारांच्या संधी कमी करण्याबाबतच्या निर्णयाचा धिक्कार करत सदरचे परिपत्रक मागे घ्यावे अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे प्रधान सचिव प्रदीप कुमार यांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जाहिरातीत सातत्य नसते, पदांची जाहिरात निघणे व प्रत्यक्षात भरती प्रक्रिया यामध्ये मोठे अंतर असते. वयाची अट असली तरी सहाच वेळा उमेदवारांना संधी मिळते. यामुळे सातत्याने तयारी करत अपयश मिळणाऱ्या उमेदवारांची निराशा वाढीस लागू शकते. लोकसेवा आयोगाने उमेदवारांची संधी याबाबत नव्याने नियम राबविणे चुकीचेच आहे. अनेक सरकारी कार्यालयात कंत्राटी पद्धतीने कामगार भरती त्याचप्रमाणे संधींची संख्या कमी केली तरी बेरोजगारांची संख्या वाढण्याचीच जास्त शक्यता आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी प्रशिक्षण, नोट्स, टिप्स आदी उपक्रम राबवून त्यांचे मनोबल उंचावण्यापेक्षा वयाची अट असताना संधी कमी करणे म्हणजे मनोबल कमी केल्यासारखे असून, लोकसेवा आयोगाने तातडीने संधींच्या संख्येचा नियम रद्द करावा अन्यथा मनसे स्टाईल राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या पत्रावर खंडेराव मेढे, चेतन पेडणेकर, बाजीराव नवले, वैभव शिंदे, अमोल रोगे, राजाभाऊ जाधव, नामदेव बोराडे, नितीन काळे, शिवा जाधव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
फोटो कॅप्शन :: - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे प्रधान सचिव प्रदीप कुमार यांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या मागण्यांचे पत्रक खंडेराव मेढे, चेतन पेडणेकर, वैभव शिंदे, राजाभाऊ जाधव, बाजीराव नवले यांनी दिले.
Attachments area