सायखेडा : गोदाकाठ भागातील दहा गावांना पुराच्या पाण्याचा वेढा दिला असून, पूरस्थिती गंभीर झाल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सायखेडा व चांदोरी गावांची पाहणी केली. यावेळी आमदार अनिल कदम, तहसीलदार दीपक पाटील, प्रांत अर्चना पठारे उपस्थित होते. गोदाकाठ भागातील सायखेडा, चांदोरी, नागापूर, चाटोरी, शिंगवे, शिंपीटकळी, दारणसांगवी, करंजगाव, चापडगाव, मांजरगाव, शिंगवे या गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. सायखेडा-चांदोरी या गावांचा संपर्कतुटला असून, अनेक नागरिक पाण्यात अडकले होते. केंद्रीय राखीव दलाच्या जवानांनी त्यांना बाहेर काढले. पूरस्थिती गंभीर झाली असल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी नागरिकांनी समस्यांचा पाढा वाचला. प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन नागरिकांना योग्य त्या वस्तूंचा पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी उदय सांगळे, जगन कुटे, तालुकाध्यक्ष आदेश सानप, संदीप टर्ले आदी उपस्थित होते़
पालकमंत्र्यांनी दिल्या सतर्कतेच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 12:36 AM
सायखेडा : गोदाकाठ भागातील दहा गावांना पुराच्या पाण्याचा वेढा दिला असून, पूरस्थिती गंभीर झाल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी ...
ठळक मुद्देसायखेडा : गोदाकाठ भागातील दहा गावांना पुराच्या पाण्याचा वेढा दिला असून, पूरस्थिती गंभीर झाल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सायखेडा व चांदोरी गावांची पाहणी केली.