नाशिक : महामार्गावर चालणारे ढाबे, हॉटेल्स व रेस्टॉरंटचालकांकडून दरमहा हप्ते गोळा करणाºया नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या एका पोलीस कर्मचाºयाची ध्वनीचित्रफीत सोशल माध्यमावर जोरदार व्हायरल झाली असून, त्यामुळे दुर्जनांचे कर्दनकाळ म्हणवून घेणाºया पोलीस यंत्रणेचे व लाच देणे-घेणे गुन्हा ठरविणाºया लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हप्ते गोळा करणाºया कर्मचाºयाकडून थेट पोलीस उपअधीक्षकाच्या नावाचा वारंवार उल्लेख केला जात असल्यामुळे दोन्ही खाते दोषींवर कारवाई करणार काय, असा सवालही विचारला जात आहे.अवैध धंदेचालकांकडून हप्ते गोळा करणे काही नवीन राहिलेले नाही, परंतु आता महामार्गावरील ढाबे, हॉटेल्स, रेस्टॉरंटचालकांनाही पोलिसांनी लक्ष्य केले असून, त्यासाठी प्रत्येक व्यावसायिकाकडून महिनाकाठी तीन ते पाच हजार रुपये गोळा केले जात असल्याचे या ध्वनीचित्रफितीवरून स्पष्ट झाले आहे. नाशिक ग्रामीण पोलीस दलातील हा कर्मचारी आपल्या खासगी कारने महामार्गावरील हॉटेल्स चालकांकडून पैसे गोळा करीत असल्याची चित्रफित याच व्यवसायातील एका व्यक्तीने तयार केली आहे.दिवाळी सणामुळे धंदा पाणी कमी आहे, असे म्हणून हप्त्याची रक्कम कमी करा, अशी आर्जव करणाºया व्यावसायिकाचे काही एक म्हणणे ऐकून न घेता पोलीस कर्मचाºयाकडून नव्यानेच रुजू झालेल्या एका पोलीस उपअधीक्षकाचा धाक दाखवून रकमेची मागणी केली जात असल्याचे या ध्वनीचित्रफितीत स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे नवीन उपअधीक्षकाविषयी अनभिज्ञ असलेल्या व्यावसायिकाला पोलीस कर्मचाºयाने आपल्या भ्रमणध्वनीवर असलेला उपअधीक्षकाचे छायाचित्र दाखवून ‘साहेब भलतेच कडक’ असल्याची जाणीवही करून दिली असून,यापूर्वीही या उपअधीक्षकाने जिल्ह्यात कर्तव्य बजावलेले असल्यामुळे त्यांना कोणाचे कोणते धंदे चालू आहेत याची इत्यंभूत खबर असल्याची अधिकची माहितीही या कर्मचाºयाने व्यावसायिकाला दिली आहे. गेल्या काही वर्षांपासून हप्त्याची रक्कम वाढविली नाही की कमीही केली नाही, असे आवर्जून सांगणाºया या कर्मचाºयाने कारच्या सीटवर बसूनच हा सारा संवाद उघडपणे साधला. हप्त्याची रक्कम कमी करण्याची मागणी करणाºया व्यावसायिकाला उद्देशून या कर्मचाºयाने ‘साहेब नवीन आहे, त्याला कसे सांगू पैसे कमी घे’ अशी वरिष्ठाप्रती एकेरी भाषेचा शब्दप्रयोग करण्यातही मागेपुढे पाहिले नाही. साधारणत: साडेपाच ते सहा मिनिटांच्या असलेल्या या ध्वनीचित्रफितीत दोघांमधील संभाषण स्पष्टपणे ऐकू येत असून, महामार्गावर जमा केलेली हप्त्याची रक्कम कारच्या सीटवरच गोळा करून ठेवणाºया या कर्मचाºयाने अखेर व्यावसायिकाला न जुमानता त्याच्याकडून हप्त्याच्या रकमेच्या नोटा मोजून घेतल्या आहेत.गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सोशल माध्यमावर हा व्हिडीओ जोरदार फिरत असून, त्यातून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एरव्ही लाचेची मागणी केल्याचा संभाषण हाच पुरावा मानणाºया लाचलुचपत प्रतिबंधक खात्यासाठी ही ध्वनीचित्रफित ढळढळीत पुरावा मानला जात आहे. तथापि, आपल्याच सहखात्याचा पोलीस कर्मचारी व उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाºयाशी संबंधित असलेल्या या घटनेबाबत लाचलुचपत प्रतिबंधक खाते काय कारवाई करते, तसेच खुद्द पोलीस अधीक्षक काय पावले उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.ग्रामीण पोलीस कर्मचारी पाटीलचे निलंबनपेठ उपविभागीय अधिकारी सचिन गोरे यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर प्रभारी नियुक्ती करण्यात आलेले पोलीस निरीक्षक डी़ आऱ पाटील यांच्या नावे हॉटेलचालकांकडून पाच हजार रुपयांची हप्तावसुली केली जात असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल झाला होता़ या प्रकरणी ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी नाशिक ग्रामीण पोलीस दलातील कर्मचारी विलास पाटील यास निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत़ पाटील याची खातेअंतर्गत चौकशी करण्यात येणार आहे़ दरम्यान, नाशिक ग्रामीणमध्ये हॉटेलच्या नावाखाली अवैधरीत्या मद्यविक्री आणि मद्यसेवनासाठी जागा उपलब्ध करून दिली जात होती, हे या घटनेमुळे समोर आले आहे़
हप्ते घेणाऱ्या पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 1:03 AM
महामार्गावर चालणारे ढाबे, हॉटेल्स व रेस्टॉरंटचालकांकडून दरमहा हप्ते गोळा करणाºया नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या एका पोलीस कर्मचाºयाची ध्वनीचित्रफीत सोशल माध्यमावर जोरदार व्हायरल झाली असून, त्यामुळे दुर्जनांचे कर्दनकाळ म्हणवून घेणाºया पोलीस यंत्रणेचे व लाच देणे-घेणे गुन्हा ठरविणाºया लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ठळक मुद्देअनेक प्रश्न उपस्थित : लाचलुचपत खाते संशयाच्या भोवºयात