शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

हेच आले शिवसेनेच्या अंगलट

By admin | Published: September 12, 2014 12:30 AM

हेच आले शिवसेनेच्या अंगलट

नाशिक म्हणजे राजकीय पक्षांची प्रयोगशाळा बनली आहे. अडीच वर्षांपूर्वी महापालिकेत भाजपाने पारंपरिक सहकारी शिवसेनेशी युती टाळून मनसेला साथ देत सत्ता स्थापन केली. भाजपाचा हा एक प्रयोग मानला गेला. आगामी काळात भाजपा-मनसे हीच युती असेल किंवा मनसे-सेना-भाजपा अशी युती असेल असे या प्रयोगावरून भाकीत व्यक्त केले जात होते. भाजपाचा हा प्रयोग संपला; परंतु आता दुसरा राजकीय प्रयोग होण्याची सुरुवात झाली आहे. ती म्हणजे मनसे-कॉँग्रेस- राष्ट्रवादी अशी आघाडी होय. खरे तर आघाडीच्या दृष्टीने मनसेही शत्रुपक्षच. तथापि, अशी राजकीय अगतिकता का आली त्याचे एक कारण म्हणजे शिवसेनेने चालवलेला घोडेबाजार. गेल्या वर्षी माकप आणि जनराज्य आघाडीच्या एकेक नगरसेवकाला गळाला लावले. त्यानंतर आता मनसेच्या दोन नगरसेवकांना पळवले. पाठोपाठ कॉँग्रेसचे सहा नगरसेवकही सेनेला समर्थन देण्याची अटकळ बांधली जात आहे. परंतु राष्ट्रवादीचेही काही नगरसेवक सेनेच्या संपर्कात आहेत. खरे काय ते सभागृहात कळेल. परंतु या निवडणुकीत शिवसेनेने केलेला घोडेबाजार बेसुमार तर आहेच; परंतु सर्वच पक्षांना फोडल्याने हे सारेच दुखावून एकत्र आले आहेत. शिवसेनेत द्रव्यबळाचा साक्षात्कार देणारा प्रबळ उमेदवार आहे; परंतु तीच बाब शिवसेनेच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या घोडेबाजारमुळे नंतरच्या काळात भ्रष्टाचार वाढणार नाही का, असा प्रश्न कॉँग्रेस शहराध्यक्षांनी केला आहे. शिवसेनेचा उमेदवार हा अर्थकारण करण्यात पटाईत आहे. त्यामुळे अन्य उमेदवार असता तर कदाचित विरोधी पक्षांकडून विरोध झाला नसता, असेही त्यांनी सहज बोलताना सांगितले. उत्साह असावा मात्र अतिउत्साह, अति आत्मविश्वास कसा अडचणीत आणतो याचे हे उदाहरण आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत सेनेचा विजय झाला तर ठीकच आहे; अन्यथा परभव झाला तर त्याला अतिउत्साहच कारणीभूत असेल, हे मात्र नक्की.- संजय पाठक