नांदगाव : कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी मास्क, सॅनिटायझर वापरण्याचे व साबणाने हात धुण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अनेकांनी या वस्तूंचा वैयक्तिक वापर सुरूकेला असला तरी अद्याप कळते पण वळत नाही असा एक वर्ग आहे. अशाच वर्गाला हात धुण्याची आठवण व्हावी... व धुतले नसल्यास तशी सोय दिसली की आता तरी हात स्वच्छ धुवावेत असा मनात आलेला विचार कृतीत उतरवावा, यासाठी काही युवकांनी एकत्र येऊन तशी सुविधा रस्त्यावरून जाणाऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे.निर्मलग्राम पुरस्कार विजेते भास्करराव पेरे पाटील यांनी त्यांच्या पाटोदा गावात लोक कुठेही थुंकतात म्हणून जागोजागी बेसीन लावून ठेवले व त्यावर ‘आता इथे थुंका’ असा फलक लावला. त्यामुळे कुठेही थुंकण्याच्या प्रवृत्तीला आळा बसला. त्यांच्यापासून प्रेरणा घेत नांदगावच्या युवकांनी हा उपक्रम सुरू केला. पेरे पाटील यांच्या कल्पकतेची आठवण बालाजी चौकातला द्रवरूप साबण व हात धुण्यासाठी केलेली सोय बघितल्यावर होते. ‘येथे हात धुवा’ हा फलक रस्त्यावरून जाणाºयाचे लक्ष वेधून घेत आहे.बालाजी चौकात भिंतीला द्रवरूप साबणाच्या (हॅण्ड वॉश) दोन बाटल्या लावण्यात आल्या असून, पाण्याचा नळही जोडण्यात आला आहे. पाण्यासाठी ७५० लिटरची टाकी जोडण्यात आली असून, त्यात पाणी राहील याची व्यवस्था करण्यात आली आहे. किशोर आबड, मंदार रत्नपारखी, हेमंत जैन, बाळू फोफलिया, आनंद चोपडा, डॉ. रमणलाल गादिया आदींनी वर्गणी करून ही सोय केली आहे. बाजाराकडे जाणाºया या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. या तरु णांनी निर्माण केलेल्या सुविधांचा उपयोगही होत आहे.
...येथे हात धुवा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 10:01 PM
कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी मास्क, सॅनिटायझर वापरण्याचे व साबणाने हात धुण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अनेकांनी या वस्तूंचा वैयक्तिक वापर सुरूकेला असला तरी अद्याप कळते पण वळत नाही असा एक वर्ग आहे. अशाच वर्गाला हात धुण्याची आठवण व्हावी... व धुतले नसल्यास तशी सोय दिसली की आता तरी हात स्वच्छ धुवावेत असा मनात आलेला विचार कृतीत उतरवावा, यासाठी काही युवकांनी एकत्र येऊन तशी सुविधा रस्त्यावरून जाणाऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे.
ठळक मुद्दे कोरोनाला ‘गो’ करण्यासाठी व्यवस्था