शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

दुसऱ्या दिवशीही धुव्वाधार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 9:56 PM

नाशिक : शहर व परिसरात शनिवारी (दि.१३) संध्याकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळपासून वातावरणात उकाडा जाणवत होता. मध्य नाशिकसह उपनगरांमध्ये संध्याकाळी ५ वाजता मुसळधार सरींचा वर्षाव सुरू झाला. सायंकाळी साडेपाच वाजेनंतर पावसाचा जोर वाढल्याने बºयाच भागात वीजपुरवठा खंडित झाला.

नाशिक : शहर व परिसरात शनिवारी (दि.१३) संध्याकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळपासून वातावरणात उकाडा जाणवत होता. मध्य नाशिकसह उपनगरांमध्ये संध्याकाळी ५ वाजता मुसळधार सरींचा वर्षाव सुरू झाला. सायंकाळी साडेपाच वाजेनंतर पावसाचा जोर वाढल्याने बºयाच भागात वीजपुरवठा खंडित झाला. सलग दुसºया दिवशी जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे शहरातील रस्ते जलमय झाले तसेच गोदावरीच्या पाण्याच्या पातळीतही वाढ झाली आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.शुक्रवारपासून शहरात मान्सूनचे आगमन झाले असून, शनिवारी वातावरणात दमटपणा अधिक होता. कमाल तापमान ३१.८ असल्याने दिवसभर नागरिकांना उष्णता जाणवली. मात्र, दुपारी ४वाजेनंतर शहरात मेघ दाटून आले. साडेचार वाजेपासून जुने नाशिक, मध्य नाशिक, पंचवटी, वडाळागाव, नाशिकरोड, कामटवाडे, इंदिरानगर, उपनगर या भागांत मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळल्या. या भागात दीड तास पावसाचा जोर कायम रहिला. विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. यानंतर शहरात सर्वत्र पावसाचा जोर वाढत गेला. त्यामुळे काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. बाजारपेठा पूर्ववत सुरू झाल्याने पावसाच्या आगमनाचा परिणाम जाणवला. बाजारात आलेल्या ग्राहकांसह फेरीवाल्यांची तारांबळ उडाली. शुक्रवारी मध्यरात्रीदेखील पावसाच्या सरी कोसळल्याने शनिवारी सकाळी ढगाळ वातावरण दिसले. दरम्यान, शनिवारी सायंकाळपासून शहरात पावसाची संततधार सुरू झाल्याने रस्ते जलमय झाले होते.--------------------------मोकळ्या भूखंडांना तलावाचे स्वरूपशहरातील सीबीएस, शालिमार, कॉलेजरोड, गंगापूररोडवरील सखल ठिकाणी रस्त्यांना तळ्यांचे रूप आल्याचे दिसले. काही ठिकाणच्या मोकळ्या भूखंडातही पाणी साचले. यामुळे वाहनधारकांसह पायी चालणाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागला. दरम्यान, कोरोनाची रुग्णसंख्या शहरात वाढत असून, साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने आजाराची भीती नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.-------------------------श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजासमोर उद्यानालगत असलेला अनेक घटनांचा साक्षीदार पुरातन पिंपळ वृक्ष शनिवारी सकाळच्या सुमारास कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित व वित्तहानी झाली नाही. सदर वृक्ष काळाराम मंदिर पूर्व दरवाजाच्या बाहेर भिंतीवर कोसळला आहे. शुक्रवारी (दि. १२) झालेल्या मुसळधार पावसामुळे वृक्षाभोवती असलेला परिसर पाण्याने भिजला गेला व त्यातच झाडाचा बुंधा मोकळा केल्याने सदर झाड कोसळले.------------------वृक्ष कोसळलेबोधलेनगर सिग्नल परिसरात एक वृक्ष कोसळला. त्याआधी सकाळी पंचवटीत काळाराम मंदिरानजीकचा एक वृक्षदेखील उन्मळून पडला. अग्निशमन दलाच्या जवानांनी मदतकार्य राबवून वृक्ष रस्त्यातून बाजूला केले. यासह शहरात विविध भागात झाडांच्या फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या. फुले, पाने, ओल्या फांद्या रस्त्यावर पडल्याने काही ठिकाणी वाहने घसरली.

टॅग्स :Nashikनाशिक