शहराच्या मध्य भागातून वाहणाऱ्या मोसम नदीत मोठ्या प्रमाणात माननिर्मित कचरा साचला आहे. पूरपाणी आल्यास हा कचरा थेट गिरणा धरणात वाहून जातो. धरणातून मालेगाव, नांदगाव तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. दरवर्षी महापालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शेकडो टन कचरा पावसाळ्यात मोसमला आलेल्या पुरामुळे धरणामध्ये वाहून जातो. कॅम्प, भायगाव येथे गिरणा - मोसम नदीच्या संगमापर्यंतच्या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात घाण कचरा टाकला जातो. त्यात नष्ट न होणाऱ्या प्लास्टीकच्या कचऱ्याची ढिगारे नदीपात्रात साचलेले आढळून येतात. शहराच्या पूर्व व पश्चिम भागातील गटारींचे सांडपाणी सर्रासपणे नदीपात्रात सोडले जाते. नदीपात्रात बारमाही दुर्गंधी पसरलेली राहते. यामुळे डास कीटकांचे मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होऊन नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. महापालिकेच्या व शासनाच्या पूर नियंत्रण विभागाच्या बेफिकीर वृत्तीमुळे मोसम नदीपात्राचे गटार गंगेत रूपांतर झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून मोसम नदी सुधार योजना कागदावर दिसून येत आहे. राजकीय इच्छाशक्तीअभावी मोसम नदीची स्वच्छता होत नाही. मोसम नदी स्वच्छतेसाठी महापालिकेकडे कुठलेही धोरण नाही. उपाययोजना राबविल्या जात नाही.
इन्फो...
एकेकाळची मोक्षगंगा बनली गटारगंगा
शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणारी मोसम नदी एकेकाळी शहरासाठी जीवनदायिनी होती. बाराही महिने पाण्याचा प्रवाह सुरू राहायचा; मात्र सद्य:स्थितीत नदीची दुरावस्था झाली आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात सांडपाणी सोडले जाते. मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. बेकायदेशीर कत्तलींचे रक्तमिश्रीत पाणी नदीपात्रात सोडले जाते. यामुळे नदी प्रदूषित बनली आहे. मोसम नदीपात्रात साचलेला हजारो टन कचरा नदीला येणाऱ्या पहिल्याच पुरात वाहून गिरणा धरणात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे. महापालिकेसह सर्वच विभागांनी मोसम नदीपात्र स्वच्छ करण्यासाठी स्वच्छता मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.
फोटो फाईल नेम : ०५ एमजेयुएल ०२ . जेपीजी
फोटो कॅप्शन : मालेगाव शहरातील मोसम नदीपात्रात साचलेले दुर्गंधीयुक्त पाणी व घाण - कचरा.
050721\05nsk_19_05072021_13.jpg
फोटो कॅप्शन बातमी सोबत दिले आहे.