शहरासह देशातील विविध भागातील सांडपाण्याची समस्या लक्षात घेऊन के. के. वाघ तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या ‘मायक्र ोबाएल फ्युएल सेल’ (एमएफसी) प्रकल्पाच्या माध्यमातून सांडपाणी व्यवस्थापनासोबतच वीजनिर्मिती करणे शक्य असल्याने या प्रकल्पाला ‘राष्ट्रस्तरीय केमफेस्ट २०१६’ मध्ये सुवर्णपदक मिळाले. के. के. वाघ तंत्रनिकेतन महाविद्यालयातील समृद्ध कुलकर्णी, प्रणव कुलकर्णी, सागर कुलकर्णी, जालिंदर रोटे आदि विद्यार्थ्यांनी प्रा. प्रवीण पाठक यांच्या मार्गदर्शनात अॅनॉड व कॅथॉडचेंबरचा वापर करून अॅनॉड चेंबरमध्ये पाणी साठवून त्यात ग्राफाईट इलेक्ट्रोड रॉडच्या साहाय्याने सांडपाण्याचे शुद्धीकरण व वीजनिर्मितीचा प्रयोग यशस्वी केला. विद्यार्थ्यांनी भविष्याचा वेध घेऊन सांडपाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढल्याने त्यांचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान झाला. दरम्यान, अशा प्रकारचे छोटे छोटे प्रकल्प एका साखळीत जोडून अधिक प्रमाणात वीजनिर्मिती शक्य असल्याचा विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. अशा प्रकल्पांमुळे सांडपाण्याने होणारे प्रदूषण दूर होऊन वीजनिर्मिती होणार असल्याने येणाऱ्या काळात शुद्ध वीजनिर्मितीचा स्त्रोत म्हणून विद्यार्थ्यांचा हा प्रयोग पुढे येऊ शकतो.
सांडपाणी पुनर्वापर, वीजनिर्मितीचा प्रयोग
By admin | Published: September 15, 2016 12:29 AM