नांदगाव : रेल्वे फाटकावर असलेली जलवाहिनी अचानक फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. मुंबई- भुसावळकडील जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या लोहमार्गावरदेखील पाणी आले. त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी या पाण्याला वाट करून दिल्यामुळे पाण्याखाली लोहमार्ग येण्याचा धोका कमी झाला. अर्थात रेल्वे वाहतुकीवर त्याचा कोणताही परिणाम झाला नसल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. रेल्वे कर्मचारी माधव नंद याने स्टेशन मास्टर यांना ही बाब कळविली. पालिकेच्या जलवाहिनी वारंवार फुटण्याचे प्रकार घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर ऐन रेल्वे फाटकाजवळ असलेली जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले शिवाय लोहमार्गावर त्यामुळे अडथळा निर्माण झाला असता तथापि केवळ प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला. या पार्श्वभूमीवर पालिकेने तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
पाइपलाइन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया
By admin | Published: September 11, 2014 10:08 PM