वीरगाव : बागलाण तालुक्यातील वटार येथे पाण्याच्या टँकरखाली सापडून अकरा वर्षांचा मुलगा ठार झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी (दि.६) सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. मृत अक्षय नंदू गांगुर्डे (११) हा वीरगाव येथील रहिवासी आहे.वीरगाव येथील हिरामण भिला गांगुर्डे यांचा नातू अक्षय नंदू गांगुर्डे (११) हा गुरुवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास आपल्या वडिलांसमवेत वटार येथे नातेवाइकांकडे पाण्याचे टँकर भरण्यासाठी गेला होता. टँकर भरून परत येत असताना एका अवघड वळणावर अक्षयचा तोल गेल्याने तो खाली पडला. याचवेळी त्याच्या अंगावरून चाक तो जागीच ठार झाला. शोकाकुल वातावरणात मृत अक्षयवर सकाळी ९ वाजेच्या सुमारास वीरगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.नंदू गांगुर्डे यांना तीन मुलं असून, अक्षय हा यात सगळ्यात लहान होता. येथील केबीएच विद्यालयात तो शिक्षण घेत होता. नुकतीच त्याने पाचवीची परीक्षा देऊन त्यात तो उत्तीर्ण झाला होता. या घटनेने संपूर्ण वीरगाव गावावर शोककळा पसरली आहे. सटाणा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.सद्यस्थितीत वीरगाव या गावातील सुमारे वीस ते पंचवीस टँकरधारक शेतकरी परिसरातील वटार, दसाणा, केरसाणे या गावातून टँकरने पाणी आणून आपली शेती वाचविताना दिसत आहेत; मात्र हीच जीवघेणी पाणीटंचाई आता थेट मानवी जिवावरच उठली असून, यातूनच टँकरचा तालुक्यातील पहिलावहिला निरागस बळी जाण्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
वटारला टँकरखाली सापडून मुलगा ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2019 11:52 PM
वीरगाव : बागलाण तालुक्यातील वटार येथे पाण्याच्या टँकरखाली सापडून अकरा वर्षांचा मुलगा ठार झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी (दि.६) सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. मृत अक्षय नंदू गांगुर्डे (११) हा वीरगाव येथील रहिवासी आहे.
ठळक मुद्देनिरागस बळी जाण्याची दुर्दैवी घटना