लोकमत न्यूज नेटवर्कवटार : येथे एका इसमाचा कोरोनाने मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा सजग झाली असून, गाव सात दिवस बंद करण्याचा निर्णय गाव प्रशासनाने घेतला आहे. शनिवारी मृत्यू झालेल्या इसमाचा स्वॅब मृत्यूपूर्वी घेण्यात आला होता.गावात वीरगाव आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी देवरे व त्यांची टीम येऊन पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तीच्या संपर्कातील हायरिस्क व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना कोविड सेंटर येथे रवाना करण्याची व्यवस्था करण्याचे काम करत आहेत. सरपंच कल्पना खैरनार यांनी सात दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.सर्व यंत्रणा सतर्क झाली असून, गावातील कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांना घरातून बाहेर न निघण्याचा सूचना दिल्या आहेत. यावेळी उपसरपंच जितेंद्र शिंदे, जिभाऊ खैरनार, ग्रामसेवक वसंत भामरे, पोलीसपाटील किरण खैरनार, जिभाऊ खैरनार, ग्रामपंचायत सदस्य हरिश्चंद्र अहिरे, राजेंद्र खैरनार, संतोष खैरनार, जे. पी. खैरनार, शिवाजी खैरनार, देवमान माळी आदी उपस्थित होते.
वटारला कोरोनाचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 9:06 PM
वटार : येथे एका इसमाचा कोरोनाने मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा सजग झाली असून, गाव सात दिवस बंद करण्याचा निर्णय गाव प्रशासनाने घेतला आहे. शनिवारी मृत्यू झालेल्या इसमाचा स्वॅब मृत्यूपूर्वी घेण्यात आला होता.
ठळक मुद्देउपाययोजना : सात दिवस गावबंद