शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

जलयुक्तची वहिवाट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2018 1:59 AM

यंत्रणेने मनावर घेतले तर काय घडून येऊ शकते याचे उदाहरण म्हणून जलयुक्तच्या कामांकडे पाहता यावे. शाश्वत विकासासाठी प्रयत्नशील असलेल्या ‘युती’ सरकारच्या काळात हाती घेण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत संपूर्ण राज्यातच मोठे काम घडून आले असून, नाशिक महसूल विभागातही सुमारे ९८ टक्के उद्दिष्टपूर्ती साधली गेल्याने यापुढील काळात टंचाईच्या तक्रारी दूर होण्याची अपेक्षा करता यावी.

ठळक मुद्देजलयुक्त शिवार अभियानाला सर्वत्रच चांगला प्रतिसाद उपसला गेलेला गाळ शेतकºयांनी आपापल्या शेतासाठी वापरल्याने जमिनीचा पोत सुधारण्यासही

यंत्रणेने मनावर घेतले तर काय घडून येऊ शकते याचे उदाहरण म्हणून जलयुक्तच्या कामांकडे पाहता यावे. शाश्वत विकासासाठी प्रयत्नशील असलेल्या ‘युती’ सरकारच्या काळात हाती घेण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत संपूर्ण राज्यातच मोठे काम घडून आले असून, नाशिक महसूल विभागातही सुमारे ९८ टक्के उद्दिष्टपूर्ती साधली गेल्याने यापुढील काळात टंचाईच्या तक्रारी दूर होण्याची अपेक्षा करता यावी.आघाडी सरकारच्या काळातील योजनेला नवे रूपडे-टोपडे घालून पुढे आणल्या गेलेल्या जलयुक्त शिवार अभियानाला सर्वत्रच चांगला प्रतिसाद लाभल्याचे चित्र आहे. ‘युती’ सरकारनेही गांभीर्याने याकडे लक्ष पुरवले व पाठपुरावा करून कामे पूर्ण करवून घेतली हे मान्य करायलाच हवे. विशेषत: खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत आग्रही आहेत. त्यांनी जिल्ह्या-जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत वेळोवेळी आढावा घेतला त्यामुळेही या कामांना चालना मिळाली. नाशिक विभागात सुमारे ८५० गावांमधील वीस हजारांपेक्षा अधिक कामांचे नियोजन होते, त्यापैकी तब्बल ९८ टक्के कामे सुरू करण्यात आली असून, १५ हजारांवर कामे पूर्णही झाली आहेत. यंदाच्या पावसाळ्यात त्यामुळे परिणामकारकपणे जलसंचय व सिंचन होणे अपेक्षित आहे. पावसाच्या लहरीपणामुळे अलीकडील काळात भूजल पातळी खालावत चालली आहे. शेतशिवारावर व पाण्याच्या उपलब्धतेवरही त्यामुळे परिणाम होत आहे. यात भरीसभर म्हणून, धरणांसह जे लहान-मोठे प्रकल्प आहेत त्यातील गाळ वाढलेला असल्याने जलसाठा कमी होत असतो. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन भूजल पातळी उंचावण्यासाठी व प्रकल्पांमधील पाणीसाठा वाढविण्यासाठी गाळ उपसण्यासारखी योजना राबवून शिवार जलयुक्त करण्यावर भर दिला गेला. गाळमुक्त धरण योजनेत नाशिक विभागातील तब्बल ७२.६१ लाख घनमीटर गाळाचा उपसा केला गेल्याने सुमारे सात हजारापेक्षा अधिक टीसीएम पाणीसाठा तयार झाला आहे. उपसला गेलेला गाळ शेतकºयांनी आपापल्या शेतासाठी वापरल्याने जमिनीचा पोत सुधारण्यासही मदत घडून आली आहे. आता प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात वाढ होणार असल्याने पाणीटंचाईवर नियंत्रण तर मिळवता येईलच; पण जमिनीतील पाण्याची पातळी उंचावण्याने उत्पादकतेवरही त्याचा परिणाम अपेक्षित आहे. या योजनांमध्ये लोकसहभागही मोठा लाभला, त्यामुळेच ही कामे पूर्णत्वास जाऊ शकली आहेत. याकरिता यापूर्वीचे नाशिक विभागीय आयुक्त एकनाथ डवले, त्यांच्यानंतर आलेले महेश झगडे व विद्यमान राजाराम माने यांनी केलेला पाठपुरावादेखील महत्त्वाचाच ठरला. सरकारी योजना या कागदावरच राहात असल्याची आजवरची परिपाठी त्यागून ‘जलयुक्त’कडे गांभीर्याने लक्ष दिले गेल्यानेच हे काम उभे राहू शकले. यात दुग्धशर्करा योग असा की, पानी फाउण्डेशन व जैन संघटनांसारख्या समाजसेवी संस्थांनीही पुढे होत लोकसहभागातून कामे केलीत. एक उपयुक्त लोकचळवळच त्यातून उभी राहीली. टँकरमुक्तीच्या दिशेने पडलेली ही पावले समस्यांच्या निराकरणाची आदर्श वहिवाट घालून देणारीच ठरावी.