या पार्श्वभूमीवर पानी फाऊंडेशनचे नेमके काम, श्रमदानातून जलसंधारणाची कामे, स्पर्धेत सहभागी होणा-या गावांना काय करायचे आहे या संदर्भातील मार्गदशन करणारे प्रदर्शन शुक्रवार (दि.४) रोजी पंचायत समितीच्या सभागृहात भरणार आहे.सिन्नर पंचायत समितीच्या सभागृहात चालणारे प्रदर्शन शुक्रवार ते रविवार (दि. ६) पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजे पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. जलसंधारण ते मनसंधारण या प्रदर्शनातून तालुक्यातील जास्तीत जास्त गावे वॉटर कप स्पर्धेत सहभागी होतील असा आशावाद पानी फाऊंडेशनने व्यक्त केला आहे. शुक्रवारी (दि. ४) रोजी सकाळी १० वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, पंचायत समितीचे सभापती भगवान पथवे, उपसभापती जगन्नाथ भाबड यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.
सिन्नर येथे उद्यापासून ‘जलसंधारण ते मनसंधारण’ प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2019 5:48 PM