वडनेरभैरव : कालभैरवनाथ कावडयात्रेतून पाणी वाचवा हा संदेश देण्याचा वडनेरकरांचा उपक्र म इतरांना प्रेरणादायी आहे. धार्मिकता डोळसपणे जोपासत सामाजिक उपक्र म राबविल्यास समाज व धर्म यांचे कल्याण होते. कावडयात्रेतून एकसंधपणा व सहकार्य वृत्ती वाढीस लागते. धर्म कधीच वाईट शिकवत नाही, असे मत त्र्यंबकेश्वर येथील आनंद आखाड्याचे महंत सागरानंद स्वामी यांनी कालभैर वनाथ कावडयात्रा शुभारंभ करताना व्यक्त केले. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर होते. ‘आम्ही वडनेरकर’च्या वतीने वडनेरभैरवचे ग्रामदैवत कालभैरवनाथ जोगेश्वरीमाता यात्रोत्सवाच्या घटस्थापनेनिमित्त युवावर्गाच्या वतीने त्र्यंबक ते वडनेरभैरव अशी कावड पदयात्रा काढण्यात येत असते. त्र्यंबक येथील म्हाळसामाता मंदिर परिसरात गंगाजल आणून त्याची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जलपूजन सागरानंद यांच्या हस्ते, तर भैरवनाथ प्रतिमापूजन नगरसेवक विष्णू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुरोहित संघाचे अध्यक्ष गायधनी, शिल्पकार मानसिंह ढोमसे उपस्थित होते. यावेळी त्र्यंबकच्या मुख्य रस्त्यावरून सजविलेल्या रथातून गंगाजल कावडयात्रा मिरवणूक काढण्यात आली. जय मल्हार वाघे मंडळ यांनी भैरवनाथांची गाणी म्हटली. सागरानंद महाराज यांचा सत्कार योगेश निखाडे यांनी, नगराध्यक्ष लोहगावकर यांचा सत्कार आबा पवार यांनी, गायधनी यांचा सत्कार दिलीप भालेराव यांनी, तर नगरसेवक धोबडे यांचा सत्कार नितीन कोपरे यांनी केला. सागरानंद स्वामी, लोहगावकर यांनी पाणी वाचविण्यासाठी व जनजा गृतीसाठी कावडयात्रा उपक्र माचे भाषणात स्वागत केले. कालभैरवनाथ यांना या पाण्याने जलाभिषेक करण्यात येणार आहे.
पाणी वाचवा संदेश उपक्रम प्रेरणादायी : सागरानंद स्वामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:11 AM